भोपळा, कारले, काकडी, कलिंगड इत्यादी पिकांच्या शेतीसाठी कोणते हवामान योग्य आहे?

  • वेलवर्गीय भाज्या या उपोष्ण कटिबंधीय हवामानात होतात आणि त्यांची उत्तम वाढ होण्यासाठी आणि अधिक उत्पादन मिळण्यासाठी त्यांना उष्ण आणि दमट हवामानाची गरज असते
  • त्यांची चांगली वाढ आणि उत्तम फळधारणा होण्यासाठी रात्र आणि दिवसाचे तापमान अनुक्रम १८ ते २२ डिग्री सेल्सिअस आणि ३० ते ३५ डिग्री सेल्सिअस असणे योग्य आहे.
  • २५ ते ३० डिग्री सेल्सिअस तापमानाला बिया उत्तम प्रकारे आणि वेगाने रुजून येतात.
  •  योग्य तापमानाला वाढवलेल्या रोपांना मादी फुले आणि फळे जास्त प्रमाणात येतात.
Share

काकडीसाठी शेत तयार करणे

  • सुरूवातीच्या टप्प्यत शेत चार-पाच वेळा नांगरून ठिसूळ बनवावे आणि शेवटच्या नांगरणी पूर्वी जमिनीमध्ये दर एकरी १०१५ टन शेणखत मिसळावे
  • जर का जमिनीत नेमाटोड कृमी, वाळव्या किंवा लाल मुंगळे यांचा प्रादुर्भाव झाला असेल तर दर एकरी दहा किलो कार्बोफ्युरॉन वापरा
  • शेत जमीन समपातळीत आणल्यावर दोन ते अडीच सेंटीमीटर अंतरावर ६० सेंटिमीटर रुंद सरी बनवा.
  • सरींची लांबी पाण्याचा स्रोत, ऋतू, पाऊस, जमिनीचा उतार यावर अवलंबून असते.
Share