आता फक्त 499 मध्ये होणार माती परीक्षण, सॉइल मॅक्स सोबत करा साइंटिफिक शेती

Khilti Plus Soil Max

मातीची उत्पादन क्षमता तिच्या सुपीकतेवर अवलंबून असते. वनस्पती त्यांच्या वाढीसाठी आणि विकासासाठी  आवश्यक पोषक तत्व मातीतून प्राप्त करतात त्यामुळे माती पोषक तत्वांनी परिपूर्ण ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. माती परीक्षणामुळे तुमच्या शेतातील माती पोषक तत्वांनी परिपूर्ण आहे की नाही याची माहिती मिळते. आता फक्त माती परीक्षणातून मातीशी संबंधित सर्व समस्याचे निदान करता येत नाही, म्हणूनच तुम्हाला ग्रामोफोनच्या ‘खेती प्लस सॉईल मॅक्स’ या सेवेत सहभागी व्हावे लागेल.

Kheti Plus Soil Max

‘खेती प्लस सॉइल मॅक्स’ या सेवेअंतर्गत तुम्हाला एकाच वेळी अनेक फायदे मिळतील. यामध्ये माती परीक्षण केले जाईल तसेच कृषी तज्ज्ञांच्या टीमकडून पुढील पिकासाठी असणारी कृषी कार्यमाला सूची देखील तयार केली जाईल. या सूचीमध्ये तुम्हाला पेरणीपासून कापणीपर्यंतची संपूर्ण कार्यमाला दिली जाईल. यासोबतच वेळोवेळी कृषी तज्ज्ञांचा सल्ला देखील मिळेल.

‘खेती प्लस सॉइल मॅक्स’ सेवेत मिळणारे फायदे

  • मातीच नमूना घेण्यासाठी ग्रामोफोनचे प्रतिनिधी तुमच्या शेताला भेट देतील.

  • आपल्या शेतातील मातीचे देशातील सर्वात विश्वासार्ह माती परीक्षण संस्थेतून चाचणी ही घरी बसल्या केली जाईल.

  • माती परीक्षणाच्या नमुन्याचा रिपोर्ट आल्यानंतर तुमच्या पुढील पिकाच्या आधारे कृषी कार्यसूची यादी तयार केली जाईल.

  • परीक्षण रिपोर्ट आणि कृषि कार्यमाला सूचीची डिजिटल कॉपी व्हॉट्सअ‍ॅप वरती आपल्या सोबत शेअर केली जाईल. तसेच, जर तुम्हाला त्याची फिजिकल कॉपी तुमच्या घरी पोहोचवायची असेल, तर ती तुमच्यापर्यंत पोहोचवली जाईल.

  • संपूर्ण पीक चक्रात कृषी तज्ज्ञांच्या सल्ल्याची आणि निरीक्षणाची सुविधा देखील मिळेल. 

यावेळी माती परीक्षण करणे आपल्यासाठी सोपे असेल त्याचबरोबर किफायतशीर ठरेल. जर तुम्ही रिपोर्टची डिजिटल कॉपी आणि कार्यमाला सूची व्हॉट्सअ‍ॅप वरती मागविली तर तुम्हाला फक्त 499 रुपये खर्च करावे लागतील. जर ही सेवा तुम्हाला तुमच्या घरी डिजिटलसह मिळवायची असेल तर तुम्ही ही सेवा 799 रुपयांमध्ये मिळवू शकता.

Share