कामधेनु डेअरी योजनेच्या मदतीने पशुपालकांना 85% अनुदान दिले जात आहे

पशुपालक शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्याच्या हेतूने राजस्थान सरकारने ‘कामधेनु डेअरी योजना’ सुरू केली आहे. याच्या मदतीने पशुपालकांना पशु व्यवसायासाठी 85% अनुदान उपलब्ध करून दिले जाईल. राज्य सरकारच्या या योजनेचा उद्देश राज्यातील देशी गायींच्या उच्च तंत्रज्ञानाच्या दुग्धव्यवसायाला चालना देणे हा आहे. या योजनेच्या माध्यमातून महिला, पुरुष आणि युवक या सर्वांना या योजनेचा लाभ मिळणार आहे.

योजनेसाठी असणारी आवश्यक पात्रता :

या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदाराकडे जनावरांसाठी कमीत कमी एक एकर जमीन आणि पुरेसा असा आहार असावा. पशूपालनाच्या क्षेत्रामधील अर्जदाराला कमीत कमी तीन वर्षांचा अनुभव असावा. याशिवाय त्यांच्याकडे एक 6 वर्षांची गाय असणेही आवश्यक आहे.

या योजनेतून मिळणारे फायदे :

अर्ज स्वीकारल्यानंतर लाभार्थ्याला कर्ज दिल्यानंतर दुग्धव्यवसाय व गाई उत्पादनांचे प्रशिक्षण दिले जाईल. या योजनेनुसार स्थानिक स्वराज्य संस्थेच्या प्रतिबंधित क्षेत्राबाहेर डेअरी चालवली जाईल. या डेअरी मध्ये एकाच जातीच्या किमान 30 गायी असतील ज्यांची दूध क्षमता जास्त असेल. ज्यांचे वय 2 ते 5 वर्षांच्या दरम्यान असावे. या योजनेपूर्वी एकाच जातीच्या 15 दूध देणाऱ्या गायी खरेदी कराव्या लागणार असून दुसऱ्या टप्प्यात 15 देशी गायी खरेदी कराव्या लागणार आहेत.

कायधेनु डेअरी योजना नोंदणी करण्याची प्रक्रिया :

या योजनेत अर्ज करण्यासाठी राजस्थान गोपालन विभागाच्या अधिकृत वेबसाइट gopalan.rajasthan.gov.in वर क्लिक करा. यानंतर एक फॉर्म दिसेल, तो डाउनलोड करा. फॉर्ममध्ये विचारलेली माहिती काळजीपूर्वक भरा आणि ती संबंधित कार्यालयात जमा करा.

स्रोत: कृषि जागरन

कृषी क्षेत्रातील अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी दररोज ग्रामोफोनचे लेख वाचत रहा आणि आजची ही माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका.

Share