कोरोना साथीच्या आजारामुळे सुरू असलेल्या देशभरातील लॉकडाऊनमध्ये, विविध प्रकारच्या सरकारी अनुदानांच्या योजनांचे लाभार्थी असणारे शेतकरी व इतर यांना यासंबंधी पूर्ण माहिती मिळू शकली नाही. अशा परिस्थितीत आपण या सर्वांशी संबंधित माहिती ऑनलाईन सहज मिळवू शकता.
जनधन योजना, एलपीजी सबसिडी योजना, पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना, आणि इतर तत्सम कल्याण योजनांची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी तुम्हाला ऑनलाईन माध्यमातून या चरणांचे अनुसरण करावे लागेल.
चरण 1: त्यास जोडलेल्या पब्लिक मॅनेजमेंट फायनान्शियल सिस्टमच्या अधिकृत संकेतस्थळावर लॉग इन करा.
@ pfms.nic.in/NewDefaultHome.aspx.
चरण 2: त्याच्या मुख्य पृष्ठावरील ‘आपली देयके जाणून घ्या’ मेनूवर क्लिक करा.
चरण 3: आता आपल्या बँकेचे नाव, खाते क्रमांक यांसारखे आवश्यक तपशील भरा.
चरण 4: पुन्हा कॅप्चा कोड सबमिट करा.
चरण 5: नंतर ‘शोध’ पर्यायावर टॅप करा.
चरण 6: त्यानंतर संपूर्ण डेबिट आणि क्रेडिट तपशील आपल्या संगणकाच्या स्क्रीनवर दिसून येईल.
चरण 7: आपल्याला आपल्या बँक खात्यांत नवीनतम पैसे हस्तांतरणाची (ट्रान्सफर) माहिती मिळेल.
लॉकडाऊनच्या वेळी जेव्हा घराबाहेर पडणे धोकादायक असते, तेव्हा हे ऑनलाइन माध्यम सर्वांसाठी खूप उपयुक्त ठरत आहे. यांसह आपण प्रत्येक योजनेची स्थिती जाणून घेऊ शकता.
स्रोत: कृषि जागरण
Share