सरकारी सब्सिडीवरती आपले स्वतःचे कोल्ड स्टोरेज सुरु करा, जोरदार कमाई होईल

Start your own cold storage on government subsidy

योग्य साठवणुकीच्या अभावामुळे बहुतांश शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात नुकसान सहन करावे लागत आहे. हे नुकसान टाळण्यासाठी अनेक शेतकऱ्यांना आपला माल कमी भावात विकावा लागत आहे. म्हणूनच तर या कोल्ड स्टोरेजच्या मदतीने शेतकरी त्यांचे उत्पादन जास्त काळ टिकवून ठेवू शकतात.

तथापि, कोल्ड स्टोरेज उघडायचे असले तरी, प्रत्येक शेतकरी आर्थिकदृष्ट्या सक्षम नसतो. शेतकऱ्यांचा हा प्रश्न सोडविण्यासाठी सरकारने ‘एकीकृत विकास मिशन’ सुरु केले आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना कोल्ड स्टोरेज उभारण्यासाठी अनुदान मिळत आहे.

या योजनेअंतर्गत शेतकर्‍यांना कोल्ड स्टोरेजच्या स्थापनेसाठी कर्ज दिले जात नाही. त्याऐवजी, सरकार त्यांना क्रेडिट लिंक्ड बॅक-एंडेड सब्सिडी देते. या योजनेचा सर्वाधिक लाभ डोंगराळ भागातील शेतकऱ्यांना मिळतो. त्यांना प्रकल्प खर्चाच्या 50% दराने सब्सिडी दिली जाते. तर दुसरीकडे सामान्य आणि मैदानी भागांत प्रकल्प खर्चाच्या 35% दराने लाभ उपलब्ध होत आहे तसेच याशिवाय एक हजार मेट्रिक टनापेक्षा जास्त क्षमतेच्या युनिट्सनाही याचा लाभ मिळतो.

या योजनेचा लाभ घेण्यासाठी, अर्जदाराने संबंधित जिल्हा कार्यालयात प्रस्ताव सादर करणे आवश्यक आहे. जेथे प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या तत्त्वावर अर्ज स्वीकारले जातात.

स्रोत: ट्रैक्टर जंक्शन

कृषी आणि शेतकऱ्यांशी संबंधित फायदेशीर सरकारी योजनांशी संबंधित माहितीसाठी, ग्रामोफोनचे लेख दररोज वाचा आणि हा लेख खाली दिलेल्या बटनावर क्लिक करुन आपल्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका.

Share