सामग्री पर जाएं
- या किडीचा जोरदार प्रादुर्भाव पावसाळ्यापूर्वी होतो.
- त्याची लागण पानांच्या खालच्या पृष्ठभागावर अधिक दिसून येते.
- हे कीटक पानांच्या शिराजवळ अंडी देतात.
- त्याच्या किडीचा जास्त प्रमाणात प्रादुर्भाव झाल्यास पाने फिकट पिवळसर होतात.
- या किडीच्या नियंत्रणासाठी प्रॉपरजाइट 57% ईसी 400 ग्रॅम / एकर किंवा स्पैरोमेसीफेंन 22.9% एससी 200 मिली / एकर किंवा एबामेक्टिन 1.9% ईसी 150 मिली / एकरी दराने फवारणी करावी.
- यासह, बवेरिया बेसियानाचा वापर एकरी प्रति 250 ग्रॅमजैविक उपचार म्हणून वापर करा.
Share
- संसर्ग झालेली फळे गोळा करून नष्ट करावीत
- फळ माशी ने अंडी घालू नयेत म्हणून माश्यांचे सापळे (फेरोमोन ट्रॅप) लावता येतात
- शेतात मक्याची रोपे लावणे परिणामकारक ठरते कारण माश्या अशा उंच रोपांवर बसतात
- फळ माश्यांच्या सुप्त अवस्थेतील कीटक उघड्यावर आणण्यासाठी शेताची खोलवर नांगरट करणे आवश्यक आहे.
- प्रतिएकरी 250 ते 500 मिली डिक्लोर्व्होस 76% ईसी फवारावे किंवा
- प्रति एकरी दोनशे मिली लॅंबडा सायहॅलोथ्रिन 4.9% सीएस फवारावे किंवा
- प्रत्येक एकरी प्रोफेनोफोस 40% ईसी + सायपरमेथ्रिन 4% ईसी फवारावे
Share
- हे किडे फळांना भोके पाडतात आणि आतला रस शोषून घेतात
- संसर्ग झालेली फळे खराब होऊन गळून पडतात
- या माश्या अंडी घालण्यासाठी कोवळ्या फळांना प्राधान्य देतात
- माशी अंडी घालण्यासाठी फळाला भोक पडते या भोकातून फळाचा रस बाहेर येताना दिसतो
- यामुळे फळे वेडीवाकडी आणि खराब आकाराची तयार होतात
- हे किडे फळांचा गर आणि कोवळ्या बिया खातात त्यामुळे तयार होण्यापूर्वीच फळे गळून पडतात
Share
- लाल कोळी किडे एक मिमी लांब असतात आणि ते नुसत्या डोळ्यांना दिसणे कठीण असते.
- कोळी किडे पानांच्या खालच्या बाजूला वस्त्या बनून राहतात.
- अळ्या तरुण आणि प्रौढ कीटक पानांच्या खालच्या बाजूने भेगा पाडतात.
- ते पानांच्या पेशीतील रस शोषून घेतात त्यामुळे वेल आणि पानांमध्ये पांढऱ्या रंगाचे डाग तयार होतात
Share
- जुन्या पिकाचे अवशेष नष्ट करा
- पिकाच्या सुरवातीच्या अवस्थेत हे कीटक दिसले तर ते हाताने पकडून नाहीसे करा.
- पिकावर सायपरमेथ्रीन 25% ईसी प्रति एकर 150 मिली+ डायलेटंट30%ईसी प्रतिएकर 300 मिली फवारा किंवा
- कीटकांच्या नियंत्रणासाठी पेरणीनंतर सुरवातीला पंचवीस दिवसांनी आणि नंतर दर पंधरवड्याला कार्बारील
- 50%डब्ल्यू पी प्रति एकरी 400 ग्रॅम फवारा प्रति एकरी 250-350 मिली डायक्लोर्वोस (डीडीव्हीपी) 76% ईसी फवारल्यास कीटकांचे समाधान कारक नियंत्रण होते.
Share
- अळी वनस्पतीचा जमिनीखालील भाग आणि जमिनीला स्पर्श करणारी फळे खातात.
- खराब झालेली मुळे आणि संसर्ग झालेला भूमिगत भाग, आणि देठाचा भाग सॅप्रोफेटिक बुरशीच्या दुय्यम संसर्गामुळे सडण्यास सुरवात होते आणि वेलींची फळे सुकू लागतात.
- संसर्गझालेली फळे मानवी वापरासाठी अयोग्य बनतात.
- प्रौढ भुंगे पानाचा पातळ भाग अधाशीपणे खाऊन त्यावर अनियमित आकाराची छिद्रे बनवतात.
- त्यांना कोवळी रोपटी आणि कोवळी पाने अधिक आवडतात आणि नुकसान झाल्यामुळे कोवळी रोपे मरू शकतात.
Share