जस्ताचे (झिंक) महत्व
- भारतातील शेतजमिनीपैकी 50% जमिनीत जस्ताचा (झिंक) अभाव आढळतो. हे प्रमाण 2025 पर्यन्त 63% एवढे होईल.
- मातीत जस्ताचा अभाव असल्यास त्या मातीत उत्पादित केलेल्या पिकातही जस्ताचा अभाव असतो असे अभ्यासांद्वारे आढळून आले आहे. IZAI नुसार भारताच्या 25% लोकसंख्येत जस्ताचा अभाव आढळतो.
- भारतात जस्त (झिंक – Zn) हे पिकाच्या उत्पादनातील घटीस जबाबदार असलेले चौथे सर्वात महत्वपूर्ण तत्व मानले जाते. ते आठ आवश्यक सूक्ष्म पोषक तत्वांपैकी एक आहे.
- जस्ताच्या अभावामुळे पिकाच्या उत्पादनात आणि गुणवत्तेत मोठी घट येऊ शकते. जस्ताच्या अभावाची लक्षणे रोपांमध्ये आढळून येण्यापूर्वीच उत्पादनात 20% पर्यंत घट होते असे आढळून आले आहे.
- जस्त रोपाच्या विकासासाठी महत्वाचे असते. रोपांमधिल अनेक एंझाइम्स आणि प्रोटीन्सचा जस्त हा एक प्रमुख घटक असतो. त्याचबरोबर जस्त रोपांच्या विकासाशी संबंधित हार्मोन्स निर्माण करते. त्यामुळे पेरांचा आकार वाढतो.
- सहसा क्षार, खडकाळ जमिनीत जस्ताचा अभाव असतो.
- नव्याने फुटलेली पाने लहान आकाराची असतात आणि त्यांच्या शिरांमधील भाग करड्या रंगाचा होतो.
- जमिनीत 20 किलो ग्रॅम प्रति एकर या प्रमाणात झिंक सल्फेट वापरुन संभाव्य हानीला आळा घालता येतो.
खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.
Share