What and When spraying in cotton ?

कापसात कोणती फवारणी केव्हा करावी

सर्व शेतकरी बंधूंचे कापसाचे पीक सुमारे 35-45 दिवसांचे झाले आहे आणि आता शेतकरी बंधु पावसानंतरच्या पहिल्या फवारणीची तयारी करत आहेत. कापसात पुढीलप्रमाणे फवारणी करण्याचा सल्ला ग्रामोफोन देते:

  1. पहिली फवारणी पेरणीनंतर 20-30 दिवसांनी:- इमिडाक्लोप्रिड 8% SL @ 100-120 मिली + 19:19:19 @ 1 किलो किंवा विपुल @ 250 मिली + कार्बेन्डाजिम 12% + मॅन्कोझेब 63% WP @ 400 ग्रॅम प्रति एकर. ही फवारणी रस शोषक कीड आणि बुरशीच्या सुरुवातीच्या संक्रमणापासून पिकाला वाचवते. रोपांच्या सुरुवातीच्या विकासासाठी आवश्यक पोषक तत्वे उपलब्ध होतात.
  2. दुसरी फवारणी पेरणीनंतर 40-45 दिवसांनी:- मोनोक्रोटोफॉस 36% SL किंवा अ‍ॅसीफेट 50% + इमिडाक्लोप्रिड 8% SP बरोबर प्रोफेनोफॉस 40% EC + साइपरमेथ्रिन 5% EC बरोबर धनजाइम गोल्ड @ 250 मिली किंवा विपुल बूस्टर @ 300 मिली प्रति एकर या प्रमाणात मिसळून करावी. या फवारणीने सर्व किडीच्या अळ्या आणि अंड्यांचे नियंत्रणकरता येते.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्‍यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

Virus problem and solution in mungbean

मुगाच्या पिकातील विषाणूची समस्या आणि उपाय

  • मुगाच्या पिकाच्या विकासाच्या दरम्यान पीत केवडा, पर्ण सुरळी, आणि पान सुरकुत्या अशा विषाणूजन्य रोगांची लक्षणे दिसतात.
  • रोपाचे वय आणि रोगाच्या लक्षणांची सुरुवात यानुसार विषाणूमुळे मुगाच्या पिकाच्या उत्पादनात 2-95% घट होऊ शकते.
  • या रोगांच्या नियंत्रणासाठी पेरणीनंतर 15 दिवसांनी थायमेथोक्साम 25% डब्ल्यूजी @ 60-100 ग्रॅम प्रति एकर या प्रमाणात पानांवर फवारावे किंवा इमिडाक्लोप्रिड 17.8% एसएल @ 100 मिली  प्रति एकर या प्रमाणात पानांवर फवारावे.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्‍यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share