औषधी आणि सुगंधित वनस्पतींच्या शेतीसाठी अनुदान
औषधी आणि सुगंधित पीक क्षेत्र विस्तार योजना:- या योजनेअंतर्गत शेतकर्यास स्वेच्छेने शेतास अनुकूल औषधी आणि सुगंधित पिकाखालील क्षेत्राचा विस्तार करण्यासाठी पिकानुसार 20 ते 75% पर्यन्त अनुदान मिळू शकते. प्रत्येक शेतकर्यास योजनेअन्तर्गत 0.25 हेक्टर पासून 2 हेक्टर पर्यन्त लाभ देण्याची तरतूद आहे. पिकानुसार अनुदानाचा तपशील पुढीलप्रमाणे:-
क्र. | पिकाचे नाव | अनुदानाची रक्कम (रूपयात) |
1. | आवळा | 13,000/- |
2. | अश्वगंधा | 5,000/- |
3. | बेल | 20,000 |
4. | कोलियस | 8,600/- |
5. | गुडमार | 5000/- |
6. | कालमेघ | 5000/- |
7. | श्वेत मुसली | 62,500/- |
8. | सर्पगंधा | 31,250/- |
9. | शतावरी | 12,500/- |
10. | तुळस | 6,000/- |
अर्ज करण्यासाठी ऑनलाईन नोंदणी करावी आणि वरिष्ठ उद्यान विकास अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा.
http://www.mphorticulture.gov.in/schemes.php
खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.
Share