Improved Varieties of Soybean

सोयाबीनची उन्नत वाणे

वाणांची निवड जमिनीचा पोत आणि हवामानानुसार करावी. पावसावर अवलंबून असलेल्या भागातल्या हलक्या जमिनीत जेथे सरासरी पर्जन्यमान 600 ते 750 मिमी असते तेथे लवकर पक्व होणारी (90-95 दिवस) वाणे पेरावीत. मध्यम लोम माती आणि 750 ते 1000 मिमी सरासरी पर्जन्यमान असलेल्या भागात मध्यम अवधीत पिकणारी (100-105 दिवस) वाणे लावावी. 1250 मिमीहून अधिक पर्जन्यमान असलेल्या जड मातीत उशिरा पक्व होणारी वाणे लावावीत. बियाण्याची अंकुरण क्षमता 70 % हून अधिक असेल आणि शेतात चांगल्या पिकासाठी वर्ग मीटरमध्ये 20 रोपे हे रोपांच्या संख्येचे प्रमाण राहील अशी काळजी घ्यावी. उपयुक्त वाणाची प्रमाणित बियाणीच निवडावीत.

मध्यप्रदेशात उपयुक्त सोयाबीनची उन्नत वाणे:-

क्र. वाणाचे नाव अवधि दिवसात हेक्टरी उत्पादन
1. JS-9560 82-88 18-20
2. JS-9305 90-95 20-25
3. NRC-7 90-99 25-35
4. NRC-37 99-105 30-40
5. JS-335 98-102 25-30
6. JS-9752 95-100 20-25
7. JS-2029 93-96 22-24
8. RVS-2001-4 92-95 20-25
9. JS-2069 93-98 22-27
10. JS-2034 86-88 20-25

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्‍यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

Qualities of selected Maize Variety

मक्याच्या निवडक वाणांची वैशिष्ठ्ये

 

क्रमांक . वाणाचे नाव बियाण्याचे प्रमाण रोपातील दूरी पेरणीची खोली पेरणीची वेळ दाण्यांचा रंग अधिक माहिती
1 ADV 759 8 किलो/ एकर 60 सेमी x 22.5 सेमी (ओळ x रोप) 4-5 सेमी खरीप -115-120 दिवस, रब्बी -125-135 दिवस अधिक उगवणक्षमता, समान लांबीची कणसे, टोकापर्यंत भरतात आणि मोठे दाणे, ओळींची संख्या 14, पावसावर अवलंबून भागासाठी उपयुक्त
2 PAC 751 एलीट 60 x 30-45 सेमी (ओळ x रोप) 4-5 सेमी. खरीप -115-120 दिवस, रब्बी -125-135 दिवस नारिंगी पिवळा पावसावर अवलंबून भागासाठी उपयुक्त, समान आकाराचे लहान नारिंगी पिवळे दाणे, उच्च शेलिंग टक्केवारी  (85%)। 18-20 ओळी, रोपाची ऊंची 5.5-6.5 फुट (मध्यम), उत्पादन – 30 क्विंटल/ एकर, रुंद पाने,  कणसे परिपक्व झाल्यावर देखील रोपे हिरवी रहातात त्यामुळे चार्‍यासाठी उपयुक्त.
3 6240 सिनजेंटा 5 किग्रा / एकड़ 60 x 30-45 सेमी (ओळ x रोप) 4-5 सेमी खरीप आणि जायद (80-85 दिवस) नारिंगी पिवळा चार्‍यासाठी उपयुक्ता वाण, अधिक उगवण, दाणे टोकापर्यंत भरतात, सेमी-डेंट प्रकारचे दाणे,  रोपे परिपक्व झाल्यावर देखील हिरवी राहतात. जवळपास सगळ्या जागांसाठी अनुकूल. चांगले उत्पादन, अंकुर आणि मूळ कुजव्या रोगासाठी आणि तांबेर्‍यासाठी प्रतिकारक्षमता असलेले वाण.

 

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्‍यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share