लवकरच आपले वीज बिल अर्धे करा, संपूर्ण माहिती पहा

तीव्र उष्णतेसह वाढत्या विजेचे बिल सर्वसामान्यजनतेसाठी एक मोठी समस्या निर्माण झाली आहे. अशा परिस्थितीत छत्तीसगड सरकार ‘हाफ बिजली बिल योजना’ ही योजना चालवत आहे. या योजनेच्या माध्यमातून राज्यातील लोकांना विजेच्या बिलाची फक्त अर्धी रक्कम भरावी लागणार आहे. एवढेच नाही तर, या योजनेअंतर्गत दारिद्र्यरेषेखालील येणाऱ्या लोकांना दरमहा 30 युनिटपर्यंत वीज मोफत दिली जात आहे.

या योजनेचा लाभ घेण्यासाठी असणारी आवश्यक पात्रता

400 युनिटपर्यंत विजेचा वापर करणाऱ्या ग्राहकांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. 400 युनिटपेक्षा जास्त बिल झाल्यास तुम्ही या योजनेपासून वंचित राहाल. याशिवाय या योजनेचा लाभ त्या ग्राहकांना मिळेल, ज्यांनी मागील सर्व वीजबिले पूर्णपणे भरलेली आहेत.

वीज बिलची केवळ 50% रक्कम भरण्यासाठी, ग्राहकांकडे मूळ रहिवासी प्रमाणपत्र, जुने वीजबिल, ओळखपत्र आणि आधारकार्ड असणे आवश्यक आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला अधिकृत वेबसाइटवरती अर्ज करावा लागेल.

स्रोत : कृषि जागरण

कृषी आणि शेतकऱ्यांशी संबंधित फायदेशीर सरकारी योजनांशी संबंधित माहितीसाठी, ग्रामोफोनचे लेख दररोज वाचा आणि हा लेख खाली दिलेल्या बटनावर क्लिक करुन आपल्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका.

Share