हरबऱ्यावरील घाटे पोखरणारी अळी
घाटे पोखरणारी अळी ही हरबऱ्यावरील एक प्रमुख कीड असून तिच्यामुळे पिकाची भारी हानी होते. घाटे पोखरणाऱ्या अळीमुळे उत्पादनात सरासरी 21% घट येते. या किडीमुळे हरबऱ्याच्या घाट्यांमध्ये सुमारे 50 ते 60% घट होते. हरबऱ्याखेरीज ही कीड तूर, मटार, सूर्यफूल, कापूस , मिरची, ज्वारी, भुईमूग, टोमॅटो आणि इतर कृषि आणि बागायती पिकांवर देखील हल्ला करते. ती डाळी आणि गळिताच्या धान्यासाठी एक विनाशकारी कीड ठरते.
संक्रमण:- सहसा किडीची उपद्रवाची सुरुवात अंकुरण झाल्यानंतर एका पंधरवड्यात होते आणि कळ्या फुटताना ढगाळ आणि दमट हवामान तो गंभीर होतो. मादी पांढऱ्या रंगाची, लहान आकाराची अनेक अंडी घालते. 3-4 दिवसात अंड्यांमधून अळ्या बाहेर पडतात. त्या थोडा काळ कोवळी पाने खातात आणि नंतर घाटे, शेंगा, कळ्या आणि फळांवर हल्ला करते. पूर्ण विकसित अळी सुमारे 34 मिमी लांब, हिरव्या ते तपकिरी रंगाची असते. वाढ झालेली अळी मातीत शिरून कोष बनवून राहते. या किडीचे जीवनचक्र सुमारे 30-45 दिवसात पूर्ण होते. या किडीच्या एका वर्षात आठ पिढ्या होतात.
खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.
Share