Fall army worm :- Nature of Damage and Control measures

लष्करी अळीने होणारी हानी आणि बचावासाठी उपाययोजना

हानी:-

  • ही कीड सामान्यता पाने खाते पण हल्ला तीव्र असल्यास ती कणसे देखील खाते.
  • हल्ला केलेल्या रोपांची वरील बाजूची पाने कुरतडलेली-फाटलेली दिसतात आणि कोवळ्या देठांच्या जवळ दमट भुरा दिसतो.
  • ती कणसे वरील बाजूने खाण्यास सुरुवात करते.

नियंत्रण :-

  • प्रकाश सापळे लावावेत
  • शेतात प्रत्येक एकरात 5 फेरोमोन ट्रॅप लावावेत
  • बिवेरिया बेसियाना @ 1 किलो/ एकर या प्रमाणात फवारावे
  • फ्लूबेंडामीड 480 एससी @ 60 मिली/ एकर
  • स्पिनोसेड 45% एससी @ 80 मिली/ एकर
  • थायोडिकार्ब 75% डब्ल्यूपी @ 400 ग्रॅम/ एकर
  • क्लोरॅट्रानिलिप्रोल 18.5% एससी @ 60 मिली/ एकर

यापैकी कोणतेही एक कीटकनाशक एकरी 150 लीटर पाण्यात मिसळून फवारावे.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्‍यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

Problems and solutions of sucking pest in chilli:-

मिरचीमधील रस शोषणार्‍या किडीची समस्या आणि त्यावर उपाय

मिरचीच्या पिकात मावा, तुडतुडे आणि तेलकिड्यासारख्या रस शोषणार्‍या किडीचा प्रादुर्भाव ही मुख्य समस्या असते. ही किड मिरचीच्या पिकातील हिरव्या भागातून रस शोषून हानी करते. त्यामुळे पाने मुडपतात आणि गळून जातात. रस शोषक किडीच्या संक्रमणाने बुरशी आणि विषाणूजन्य रोगांची लागण होण्याची शक्यता वाढते. त्यामुळे किडीचे वेळेत नियंत्रण करणे आवश्यक आहे:-

नियंत्रण:

प्रोफेनोफॉस 50% EC @ 400 मिली/ एकर किंवा

अ‍ॅसीफेट 75% SP @ 250 ग्रॅम/ एकर किंवा

लॅम्ब्डा सायहेलोथ्रिन 4.9% CS @ 200-250 मिली/ एकर किंवा

फिप्रोनिल 5% SC @ 300-350 मिली/ एकर या प्रमाणात फवारावे.

अधिक माहितीसाठी आमच्या 1800-315-7566 या टोल फ्री नंबरवर संपर्क साधा.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्‍यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share