75% च्या सब्सिडीवर शेतकऱ्यांना सोलर पंप मिळत आहे

Farmers are getting solar pumps at a 75% subsidy

देशातील अनेक भागांत विजेची समस्या पाहायला मिळते आणि खास करुन शेतकऱ्यांना या समस्येमुळे खूप त्रास सहन करावा लागत आहे. या कारणांमुळे शेतकऱ्यांना त्यांच्या शेतामध्ये योग्य वेळी सिंचन करता येत नाही. शेतकऱ्यांच्या या समस्येवर मात करण्यासाठी केंद्र सरकार “प्रधानमंत्री किसान ऊर्जा सुरक्षा आणि उत्थान महाअभियान (कुसुम) योजना चालवत आहे.

या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना सब्सिडीवर सौर पंप मिळतात. सौरपंपाच्या उपयोगामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या शेतात पाणी देण्यास कोणतीही अडचण येत नाही. यामुळे डिझेलचा वापरही कमी होतो म्हणूनच सरकार या योजनेला प्रोत्साहन देत आहे.

या योजनेअंतर्गत, विविध राज्यातील शेतकऱ्यांना 60% सब्सिडी मिळते, तर हरियाणामध्ये 75% सबसिडी या योजनेत दिली जाते. शेतकर्‍यांना कृषी कामांसाठी सौर पंप बसवण्यासाठी ही सब्सिडी उपलब्ध आहे.

स्रोत: कृषि जागरण

कृषी आणि शेतकऱ्यांशी संबंधित फायदेशीर सरकारी योजनांशी संबंधित माहितीसाठी, ग्रामोफोनचे लेख दररोज वाचा आणि हा लेख खाली दिलेल्या बटनावर क्लिक करुन आपल्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका.

Share