Fall army worm :- Nature of Damage

लष्करी अळीच्या किडीपासून होणारी हानी आणि तिच्यापासून बचाव

या किडीचा भारतातील पहिला हल्ला कर्नाटक राज्यात जुलै 2018 मध्ये आढळून आला. त्यानंतर ती इतर राज्यातही पसरली. मक्याच्या पिकाची हानी करणारी ही कीड इतर किडींच्या तुलनेत जास्त वेळ जीवंत राहते. या किडीचे पतंग हवेच्या प्रवाहाबरोबर रातोरात सुमारे 100 किलोमीटर पर्यंत उडत जाऊ शकतात. एक मादी तिच्या जीवनकाळात 1 ते 2 हजार अंडी देते. या किडीची केवळ मोठी लोकसंख्याच नाही तर ती ज्या प्रकारे पीक खाते ते देखील मोठ्या प्रमाणात हानी पोहोचवते. हे किडे झुंडीने धाड घालतात. त्यामुळे काही वेळातच पूर्ण पीक नष्ट होते. ही बहुभक्षी कीड जवळपास 80 प्रकारची पिके खाते पण तिला मका प्रिय आहे.

  • हे किडे सामान्यता पाने खातात पण हल्ला तीव्र असल्यास ते कणसे देखील खातात.
  • हल्ला केलेल्या रोपाची वरच्या बाजूची पाने कापलेली-फाटलेली असतात आणि अंकुराजवळ दमट भुरा दिसतो.
  • ते कणसे वरील बाजूने खायला सुरुवात करतात.

नियंत्रण

  • प्रकाश सापळे लावावेत
  • शेतात प्रत्येक एकरात 5 फेरोमोन ट्रॅप लावावेत
  • बिवेरिया बेसियाना @ 1 किलो/ एकर या प्रमाणात फवारावे
  • फ्लूबेंडामीड 480 एससी @ 60 मिली/ एकर
  • स्पिनोसेड 45% एससी @ 80 मिली/ एकर
  • थायोडिकार्ब 75% डब्ल्यूपी @ 400 ग्रॅम/ एकर
  • क्लोरॅट्रानिलिप्रोल 18.5% एससी @ 60 मिली/ एकर

यापैकी कोणतेही एक कीटकनाशक एकरी 150 लीटर पाण्यात मिसळून फवारावे.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्‍यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

Fall army worm :- Nature of Damage and Control measures

Control of fall armyworm in Maize

मक्याच्या पिकावर झुंडीने हल्ला करणार्‍या लष्करी अळीचे नियंत्रण:-

हानी:-

  • की कीड सामान्यता पाने खाते. तीव्र हल्ला झाल्यास ती मक्याची कणसे देखील कुरतडते.
  • किडीने ग्रासलेल्या रोपाची वरील बाजूची पाने फाटतात आणि पाने आणि देठांच्या जोडाजवळ दमट भुस्सा साचलेला आढळून येतो.
  • ही कीड कणीस खाण्यास वरील बाजूने सुरुवात करते.

नियंत्रण :-

  • लाईट ट्रॅप लावावेत.
  • मादीचा गंध असलेले फेरोमान ट्रॅप एकरात 5 या प्रमाणात लावावेत.
  • अळी आढळताच पुढीलपैकी एका कीटकनाशकाची फवारणी करावी:-
  • एमामेक्टीन बेंजोएट 5% SG @ 100 ग्रॅम प्रति एकर
  • फिप्रोनिल 5% SC @ 400 मिली प्रति एकर
  • क्लोरोपाइरीफॉस 50% EC @ 400 मिली प्रति एकर

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्यां पर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share