पंतप्रधान किसान योजनेचा आठवा हप्ता लवकरच प्राप्त होणार आहे, या यादीमध्ये आपले नाव तपासा

Eighth Installment of PM Kisan Yojana to be received soon, Check Your Status

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत लवकरच शेतकऱ्यांना आठवा हप्ता मिळणार आहे. मार्चअखेर सरकार हा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर पाठवणार आहे हे लक्षात घेण्यासारखे आहे की, 20 डिसेंबर 2020 रोजी या योजनेचा सातवा हप्ता जाहीर झाला आहे.

या योजनेअंतर्गत वर्षाला 6000 रुपयांचे तीन हप्ते शेतकऱ्यांना दिले जातात. हे हप्ते 2000 रुपयांचे असून, आपण या योजनेचे लाभार्थी असल्यास आणि आपल्याला या योजनेचा 8 वा हप्ता मिळेल की नाही हे आपण जाणून घेण्यास आपण इच्छुक असल्यास आपण त्याबद्दल सहजपणे माहिती मिळवू शकता.

यासाठी पी.एम किसान या वेबसाइट https://pmkisan.gov.in/ वर ‘फार्मर्स कॉर्नर’ ला भेट द्या. येथे ‘लाभार्थी स्थिती’ पर्यायावर क्लिक करा. एक पेज उघडेल तिथे आपला बँक खाते नंबर, आधारकार्ड नंबर द्यावा लागेल त्यामुळे आपल्या मोबाईल नंबरद्वारे पैसे आले की नाही त्याची आपल्याला माहिती होईल.

स्रोत: झी न्यूज

Share