ई-कृषी यंत्र अनुदान योजना शेतकऱ्यांसाठी फायदेशीर आहे, कृषी उपकरणे अनुदानावर उपलब्ध असतील?

e-Krishi Yantra Anudan Schem

भारतीय अर्थव्यवस्था शेतीवर जास्त अवलंबून आहे. म्हणूनच कृषी उत्पादन वाढविण्यासाठी सरकार अनेक पावले उचलत राहते. यातील एक पाऊल म्हणजे, मध्य प्रदेश सरकारने राज्यातील शेतकऱ्यांसाठी सुरू केलेली ‘ई-कृषी यंत्र अनुदान योजना’.

या योजनेद्वारे शेतकऱ्यांना अनेक प्रकारच्या कृषी अवजारांवर अनुदान दिले जाते. यासाठी दिलेल्या यादीमध्ये नाव दिल्यास शेतकरी अनुदानावर कृषी अवजारे खरेदी करू शकतात. या योजनेचे मुख्य उद्दीष्ट हे आहे की, शेतकऱ्यांना नवीन तांत्रिक उपकरणांची ओळख करुन द्यावी. जेणेकरून ते त्यांच्या वापराद्वारे शेतीमध्ये उत्पन्न वाढवू शकतील.

या योजनेअंतर्गत सरकार वेळोवेळी शेतकऱ्यांकडून अर्ज मागवत राहते, आणि त्याद्वारे शेतकऱ्यांना वेळोवेळी लाभ मिळतच राहतात. या योजनेकरीता अर्ज करण्यासाठी शेतकऱ्यांनी ई-कृषी यंत्र अनुदान पोर्टलवर (https://dbt.mpdage.org/index.htm) अर्ज करण्याच्या नवीन तारखेवर लक्ष ठेवले पाहिजे आणि नवीन तारखेनंतर त्वरित अर्ज करा. महत्त्वाचे म्हणजे, जूनमध्येही अनेक शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेतला आहे.

ई-कृषी यंत्र अनुदान पोर्टलवर : https://dbt.mpdage.org/index.htm

स्रोत: पत्रिका

Share