Mastitis Disease in Dairy Cattle

दुभत्या जनावरातील स्तन शोथ रोग:-

  • स्तन शोथ हा दुभत्या जनावरांना होणारा एक रोग आहे. या रोगाची लागण झालेल्या जनावरांची सुरूवातीला आचळे गरम होतात, त्यात वेदना होतात आणि सूज येते. जनावरांना ताप देखील येतो. ही लक्षणे आढळून येताच दुधाच्या गुणवत्तेवर परिणाम होतो. दुध पातळ दिसते, त्यात गाठी होतात आणि रक्त किंवा पू मिसळला जातो. जनावर खाणे-पिणे बंद करते आणि त्याला अरूचि ग्रासते.
  • हा रोग सामान्यता गाय, म्हैस, बकरी, डुक्कर इत्यादि जनावरात आढळून येतो. स्तन शोथ रोग अनेक प्रकारच्या जीवाणु, विषाणु, बुरशी, यीस्ट किंवा मोल्डच्या संक्रमणामुळे होतो. त्याशिवाय जखम आणि प्रतिकूल हवामानाने देखील तो होतो.
  • प्राचीन काळापासून हा रोग दूध देणारी जनावरे आणि त्यांना पाळणार्‍या लोकांसाठी चिंतेचा विषय राहिलेला आहे. पशु धनाच्या विकासात आणि श्वेत क्रांतीच्या सफलतेमध्ये हा रोग सर्वात मोठी बाधा आहे. दरवर्षी भारतभरात या रोगामुळे कोट्यावधी रुपयांची हानी होते आणि त्यामुळे जनावरे पाळणार्‍याची आर्थिक परिस्थिति खालावते.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्यां पर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share