- पेरल्यानंतर ताबडतोब पहिल्यांदा दा जलसिंचन करावे.
- पहिल्या सिंचनानंतर चौथ्या दिवशी दुसरे जलसिंचन करावे.
- त्यानंतर दर ७–१० दिवसांनी पुढील जल सिंचन करीत जावे.
शेतकऱ्यांनी उत्पादन वाढवण्यासाठी मार्च – एप्रिल मध्ये पिकांचे हे वाण पेरावेत.
अनुक्रमांक | पिकाचे नाव | महत्त्वाचे प्रकार (कंपनीचे नाव) |
१. | कारले | नागेश (हायव्हेज), अमनश्री, यू एस १३१५ (नूनहेमस), आकाश (व्हि एन आर) |
२. | दोडका | आरती |
३. | भोपळा | कोहिनूर (पाहुजा), व्ही एन आर ११ (व्ही एन आर) |
४. | भेंडी | राधिका, विनास प्लस, (गोल्डन), सिंघम (नूनहेमस), शताब्दी (राशी) |
५. | कोथिंबीर | सुरभी (नामधारी), एल एस ८०० (पाहुजा) |
कोथिंबीर/ धन्याच्या पिकातील भुरी
- हा कोथिंबीर/ धन्याच्या पिकाला ग्रासणारा भयानक रोग आहे.
- या रोगात पानांवर लहान पांढरट करडे डाग पडतात. ते वाढून संपूर्ण पान ग्रासतात.
- रोगग्रस्त रोपाची पाने वाळून गळतात.
- रोगाच्या प्रभावी नियंत्रणासाठी हेक्साकोनाझोल 5% एससी @ 400 मिली/ एकर किंवा टेब्युकोनाझोल 10% + सल्फर 65% डब्ल्यूजी @ 500 ग्रॅ/ एकर किंवा स्युडोमोनस फ्ल्युरोसेन्स + बॅसिलिस सबटिलिस @ 0.25 + 0.25 किग्रॅ/ एकर फवारावे.
कोथिंबीर/ धान्यासाठी योग्य माती आणि हवामान
- कोथिंबीर/ धन्याच्या पिकासाठी पाण्याचा उत्तम निचरा होणारी लोम माती उत्तम असते.
- पावसावर आधारित पिकासाठी चिकणमाती उत्तम असते. सामू 6-8 असावे.
- 20-25o C तापमान कोथिंबीर/ धन्याच्या पिकासाठी उत्तम असते.
- कोथिंबीर/ धन्याच्या पिकासाठी थंड, कोरडे आणि धुकेरहित वातावरण उत्तम असते.
Weed Management in Coriander
धने/ कोथिंबीरीतील तणाचे नियंत्रण
धने/ कोथिंबीरीच्या पिकाचा तणाशी स्पर्धा करण्याचा काळ 35-40 दिवस एवढा असतो. या काळात निंदणी न केल्यास उत्पादनात 40-45 टक्के घट येते. धने/ कोथिंबीरीतील तणाच्या दाटीनुसार आणि आवश्यकतेनुसार पुढीलपैकी कोणतेही एक तणनाशक वापरावे. | ||||||||||||||||||||||||
|
खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.
ShareSuggestions for control of yellowing of Coriander Leaves
धने/ कोथिंबीरीच्या पानातील पिवळेपणाचे नियंत्रित करण्याचे उपाय
- धने हे महत्वाचे मसाल्याचे पीक आहे. त्याचे खोड, पाने आणि बी असे सर्व भाग वापरले जातात.
- पिकाचे व्यवस्थापन नीट नसल्यास धन्याच्या फिकट पिवळेपणाची समस्या उभी राहते. त्यामुळे उत्पादन घटते आणि हिरव्या पानांची गुणवत्ता कमी होते.
- पानातील पिवळेपणाची नायट्रोजनचा अभाव, पिकावरील रोग, किडीचा हल्ला अशी अनेक कारणे असू शकतात.
- याच्या नियंत्रणासाठी मूलभूत मात्रेत (शेताची मशागत करण्याच्या वेळी) उर्वरकांच्या बरोबर नायट्रोजन स्थिरीकरण आणि फॉस्फरस विरघळवणारे जिवाणू 2 किलो/ एकर या प्रमाणात शेतात चांगले मिसळावे.
- थायोफिनेट मिथाईल 70% डब्लूपी @ 250-300 ग्रॅम/ एकर आणि क्लोरोपायरीफॉस 20% ईसी @ 500 मिली/ एकर सिंचनाबरोबर द्यावे.
- उपरोक्त ड्रेंचिंगनंतर 19:19:19 ची 500 ग्रॅम/ एकर मात्रा फवारावी.
खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.
ShareSuggestions for control of yellowing of Coriander Leaves
धने/ कोथिंबीरीच्या पानावरील पिवळेपणा नियंत्रित करण्यासाठी उपाय
- धने/ कोथिंबीर हे महत्वाचे मसाल्याचे पीक आहे. त्याच्या खोड, पाने आणि बियाण्याचा वापर केला जातो.
- योग्य नियंत्रणाच्या अभावी हे पीक पिवळे पडते आणि उत्पादन घटते.
- मातीतील नायट्रोजनचा अभाव, रोग आणि किडीमुळे धने/ कोथिंबीरीची पाने पिवळी पडतात.
- याच्या नियंत्रणासाठी मूलभूत मात्रेत उर्वरकांसह नायट्रोजन आणि फॉस्फरस स्थिरीकरण करणार्या जिवाणुंची मात्रा 2 kg प्रति एकर या प्रमाणात मातीत चांगल्या प्रकारे मिसळावी.
- थायोफिनेट मिथाईल 70 % डब्लूपी @ 250-300 ग्रॅम आणि क्लोरोपायरिफॉस 20 % ईसी @ 500 ml प्रति एकर सिंचनाद्वारे द्यावे.
- या फवारणीनंतर 19:19:19 ची 500 ग्रॅम प्रति एकर या प्रमाणात फवारणी करावी.
खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.
ShareRoot knot nematode of coriander
धने/ कोथिंबीरीच्या पिकात मुळांवरील गाठी
- संक्रमित मुळांमध्ये गाठ होते आणि अनिश्चित आकारात ती सगळ्या मुळावर पसरते.
- नियंत्रणासाठी निरोगी बियाणे वापरावे.
- शेतात वापरली जाणारी यंत्रे आणि अवजारे स्वच्छ ठेवावीत.
- धने/ कोथिंबीरीच्या पिकातील तणाचा नायनाट करावा.
- ज्या शेतात या रोगाची लागण होण्याची शक्यता आहे तेथे उन्हाळ्यात खोप नांगरणी करावी आणि शेताला उन्हात तापू द्यावे.
- संक्रमण रोपावर होते तेव्हा ठिबक सिंचनाद्वारे 2-4 किलोग्रॅम प्रति एकर पॅसीलोमायसिस लीलासिन्स वापरुन जैविक नियंत्रण करावे.
खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.
ShareSeed treatment of coriander
धने/ कोथिंबीरीच्या पिकासाठी बीजसंस्करण
- बियाणे 12 तास पाण्यात भिजवावे.
- कार्बोक्सिन 37.5 + थायरम 37.5 @ 2.5 ग्रॅम/ किलोग्रॅम बियाणे वापरुन बीजसंस्करण करावे.
खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.
ShareSowing time in coriander
धने/ कोथिंबीरीच्या पेरणीसाठी सुयोग्य वेळ
- कोथिंबीरीच्या उत्पादनासाठी जून-जुलै महिन्यात पेरणी करावी.
- धन्याच्या उत्पादनासाठी ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये पेरणी करावी.
खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.
Share