लग्न समारंभात गाणी वाजवणे महागात पडेल, सरकारने नवीन नियम लागू केले

लग्न समारंभात गाणी वाजवणे जणू ते एखाद्या महत्त्वाच्या विधीसारखे झाले आहे. नाच-गाणी न करता प्रत्येक कार्यक्रम हा फिका असल्यासारखा वाटतो. परंतु आता फ्री गाणी वाजवणे तुम्हाला महागात पडू शकते. पंजाब आणि हरियाणामध्ये गाणी वाजवताना नवीन नियम लागू करण्यात आले आहेत.

गाणी वाजवल्यास दंड आकारला जाईल : 

या नियमांनुसार म्युझिक कंपनीच्या परवानगी शिवाय हॉटेल्स आणि मोठमोठ्या पॅलेसमध्ये साउंड रिकॉर्डिंगचा वापर करता येणार नाही. जर लाइसेंस नसेल आणि गाणी वाजवताना पकडले तर तुम्हाला कॉपीराइट कायद्याच्या उल्लंघनाखाली कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागू शकते. 

नियम लागू करण्याचे कारण :

नोवेक्स कम्युनिकेशन प्राइवेट लिमिटेड कडून दाखल एका याचिकेवर सुनावणी करताना हायकोर्टाने हा निर्णय दिला आहे. याचिकाकर्त्या कंपनीकडे अनेक मोठ्या म्युझिक कंपन्यांचे हक्क आहेत. या अंतर्गत जर तुम्हाला हॉटेल्स आणि पॅलेसमध्ये साउंड रिकॉर्डिंग वाजवायचे असेल तर कंपनी कडून तुम्हाला लाइसेंस घ्यावे लागेल.

स्रोत: जागरण

कृषी क्षेत्रातील अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी दररोज ग्रामोफोनचे लेख वाचत रहा आणि आजची ही माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका.

Share