चैत्र नवरात्री 13 एप्रिलपासून सुरु होणार आहे, शुभ काळ जाणून घ्या

chaitra Navratri

चैत्र महिन्यात चैत्र नवरात्रीचा पवित्र सण साजरा केला जातो. आणि यावेळी या महोत्सवाची सुरुवात 13 एप्रिल पासून होत आहे. नवरात्री हा सण नऊ दिवस चालतो आणि पहिल्या दिवशी कलशची स्थापना केली जाते. कलश स्थापनेपासून नवरात्र हा उत्सव सुरु होतो.

नवरात्रीमध्ये कलश ची स्थापना शुभ मुहूर्तावर केली पाहिजे. पंचांगानुसार यावेळी कलश स्थापनेसाठी शुभ मुहूर्त 13 एप्रिल रोजी सकाळी 05 वाजून 28 मिनिटांनी ते सकाळी 10 वाजून 14 मिनिटांपर्यंत राहील म्हणून या काळामध्ये कलश स्थापित करा आणि त्यानंतर नऊ दिवस याची विधिवत पूजा करावी.

स्रोत: एबीपी लाइव

Share