गव्हावरील प्रमुख रोग आणि त्यांचे नियंत्रण:-
गव्हावरील रोगांपैकी तांबेरा (रस्ट) हा प्रमुख रोग आहे. तांबेरा रोग पुढील तीन प्रकारचा असतो: पिवळा तांबेरा, करडा तांबेरा आणि काळा तांबेरा.
पिवळा तांबेरा:- हा रोग पकसीनिया स्ट्रीफोर्मियस नावाच्या बुरशीमुळे होतो. ही बुरशी नारंगी-पिवळ्या रंगाच्या बीजाणुद्वारे निरोगी शेतात पसरते. हा तांबेरा पानांच्या शिरांच्या लांबील समांतर पट्ट्यांमध्ये विकसित होऊन पानावर लहान बारीक डाग पडतात. हळूहळू तो पानाच्या दोन्ही बाजूंवर पसरतो.
अनुकूल परिस्थिती:- हा रोग अधिक थंड आणि दमट हवामानात 10-15° से.ग्रे. तापमान असताना पसरतो. यामध्ये पानावरील पावडरी डाग 10-14 दिवसात फुटतात आणि हवा, पाऊस, सिंचन अशा वेगवेगळ्या माध्यमातून त्यांचे संक्रमण होते. त्याने गव्हाच्या उत्पादनात जवळपास 25% हानी होते.
करडा तांबेरा:- हा रोग पकसीनिया ट्रीटीसीनिया नावाच्या बुरशीने होतो. ही बुरशी पानांच्या वरील बाजूवर सुरू होऊन खोडांवर पसरते आणि लाल-नारंगी रंगाचे डाग पाडते. हे डाग 1.5 एम.एम. आकाराचे अंडाकृती असतात.
अनुकूल परिस्थिती:- 15 -20° से.ग्रे. तापमान असताना या रोगाचा फैलाव होतो. त्याचे बीजाणु हवा, पाऊस, सिंचन अशा वेगवेगळ्या माध्यमातून त्यांचे संक्रमण करतात. त्याची लक्षणे 10-14 दिवसात आढळून येतात.
काळा तांबेरा:- हा रोग पकसीनिया ग्रेमिनिस नावाच्या बुरशीमुळे होतो. हा रोग बाजरीच्या पिकाचीही हानी करतो. ही बुरशी रोपाची पाने आणि खोडांवर लांब, अंडाकृती आकाराचे लालसर करडे डाग पाडते. काही दिवसात हे डाग फुटतात आणि त्यातून भुकटी निघते. ती हवा, पाऊस, सिंचन अशा वेगवेगळ्या माध्यमातून संक्रमित होते आणि पिकाला हानी पोहोचवते.
अनुकूल परिस्थिती:- काळा तांबेरा इतर तांबेर्याच्या तुलनेत अधिक तापमानात म्हणजे 18 -30° से.ग्रे.वर फैलावतो. बियाण्यातील आर्द्रता (दव, पाऊस किंवा सिंचन) याची त्यासाठी आवश्यकता असते आणि सुमारे सहा तासात त्याचे पिकात संक्रमण होते. संक्रमणानंतर 10-20 दिवसांनी डाग दिसू लागतात.
नियंत्रण:-
- तांबेरा रोगाच्या नियंत्रणासाठी पीक चक्र अवलंबावे.
- रोग प्रतिरोधक वाणे पेरावीत.
- बियाणे किंवा उर्वरक यांनी संस्करण केल्यास पेरणीपासून चार आठवडे तांबेरा नियंत्रित होतो. त्यानंतर औषध देता येते.
- एकच सक्रिय घटक असलेली बुरशीनाशके पुन्हा पुन्हा वापरू नये.
- कासुगामीसिन 5%+कॉपर ऑक्सीक्लोरिड 45% डब्लू.पी. 320 ग्रॅम/एकर किंवा प्रोपिकोनाज़ोल 25% ई.सी.240 ग्रॅम/एकर फवारावे.
खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्यां पर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.
Share