बटाट्यावरील काळ्या बुरशीचे नियंत्रण:-
- या रोगाने बटाट्याची साले काळी पडतात.
- कंद रायझोकटोनियाने संक्रमित मातीच्या संपर्कात आल्याने या रोगाचा फैलाव होतो.
- या रोगाची लक्षणे रोपाच्या वरील तसेच खालील भागात आढळून येतात.
- या रोगामुळे रोपाच्या वरील भागातील हिरवेपणा कमी होतो आणि पाने जांभळ्या रंगाची दिसतात.
- रोपाच्या मुळे, कंद अशा खालील भागात डाग पडतात.
- कंद रोगग्रस्त झाल्याने पिकाची गुणवत्ता आणि बाजारभावात घट येते.
नियंत्रण:-
- पिकाची लावणी करण्यापूर्वी मातीतील पोषक तत्वे आणि पी.एच. स्तराची तपासणी करावी. मृदेतील पी.एच. स्तर कमी असल्यास हा रोग फैलावू शकत नाही.
- जेथे दरवर्षी रोगाची लागण होते अशा जागी बटाट्याचे पीक घेऊ नये.
- प्रमाणित कंदच वापरावेत. असे करणे शक्य नसल्यास जिवाणूनाशक वापरुन कंदांचे संस्करण करावे.
- सल्फर 90% wdg @ 6 किलो/प्रति एकर देणे किंवा अमोनियम सल्फेट खत वापरणे आवश्यक असते.
- रोगाचा उपचार करण्यासाठी कंदांना पेंसिकुरोन 250 सी.एस. 25 मिली /क्विंटल कंद किंवा पेनफ्लूफेन 10 मिली/ क्विंटल कंद वापरावे.
खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्यां पर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.
Share