मोफत ओला इलेक्ट्रिक स्कूटर मिळवा, या ऑफरचा लाभ घ्या

पेट्रोल आणि डिझेलचा वाढत असलेला वापर पाहून, इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन दिले जात आहे. केंद्र आणि राज्य सरकारेही इलेक्ट्रिक वाहनांसाठी आवश्यक व्यवस्था करण्यात गुंतलेली आहेत. अशा परिस्थितीत जर तुम्ही इलेक्ट्रिक स्कूटर घेण्याचा विचार करत असाल तर ही बातमी खास तुमच्यासाठी आहे.

मोफत इलेक्ट्रिक स्कूटर मिळवा :

इलेक्ट्रिक स्कूटर घेण्यासाठी आता तुम्हाला पैसे खर्च करण्याची गरज नाही. ओला इलेक्ट्रिकचे प्रमुख भाविश अग्रवाल त्यांच्या निवडक ग्राहकांना गेरुआ रंगाची ओला स्कूटर पूर्णपणे मोफत देणार आहे. या ऑफरचा लाभ घेण्यासाठी काही अटी पूर्ण कराव्या लागतात. ज्याची माहिती भाविश यांनी ट्विटरच्या माध्यमातून दिली आहे.

ऑफरचा विजेता बनण्याची अट :

एका अटीनुसार, सिंगल चार्ज मध्ये 200 किमीची  रेंज जे पूर्ण करणार ते या ऑफरच विजेते मानले जातील. जूनच्या अखेरीस विजेत्या ग्राहकांना कंपनीमध्ये बोलावून गेरुआ ओला स्कूटर दिली जाईल. 

अट ठेवण्याचे कारण :

ही ऑफर लागू करण्याचे मुख्य कारण असे आहे की, काही काळापूर्वी लोकांनी सोशल मीडियावर कंपनीच्या स्कूटर रेंज आणि रिव्हर्स फीचरबद्दल तक्रार केली होती.  याची कमतरता लक्षात घेऊन, कंपनीने त्यांच्या स्कूटरसाठी एक नवीन ऑपरेटिंग सिस्टम लॉन्च केली आहे.जेणेकरून ग्राहकांच्या तक्रारी दूर करता येतील.

स्रोत: आज तक

कृषी क्षेत्रातील अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी दररोज ग्रामोफोनचे लेख वाचत रहा आणि आजची ही माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका.

Share