भावांतर भुगतान योजनेअंतर्गत मध्य प्रदेशातील शेतीमधील नुकसान/तोटा झालेल्या शेतकर्‍यांना आर्थिक मदत देते

Bhavantar Bhugtan Yojana provides financial help to farmers of MP who suffer losses

मध्य प्रदेश सरकार शेतकर्‍यांच्या नुकसानीच्या वेळी शेतकर्‍यांना आर्थिक मदत देण्यासाठी ‘मुखमंत्री भावांतर भुगतान योजना’ राबवित आहे. या योजनेअंतर्गत शेतकर्‍यांचे नुकसान झाल्यास नुकसानीची भरपाई थेट शेतकर्‍यांच्या खात्यावर पैसे पाठवून केली जाते.

बहुधा पिकाला योग्य भाव नसल्यामुळे शेतकर्‍यांचे नुकसान होते. भावांतर योजना हे उत्पादन हमी भावासाठी मिळालेल्या नुकसानीची भरपाई करण्यासाठी उपयुक्त ठरली आहे.

या योजनेतून पिकांचे दर कमी झाल्यावर मध्य प्रदेश सरकार शेतमालाला बाजारभाव आणि किमान आधारभूत किंमती (एम.एस.पी.) मधील फरक देते, ही रक्कम शेतकर्‍यांच्या खात्यात जमा केली जाते.

या योजनेचा कसा फायदा घ्यावा?
भावांतर योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकर्‍यांनी त्यांचे उत्पादन विक्री करण्यापूर्वी नोंदणी करणे आवश्यक आहे. त्याची नोंदणी मध्य प्रदेश सरकारने तयार केलेल्या एम.पी. एर्निंग्ज पोर्टलवर करता येते. नोंदणीनंतर शेतकर्‍यांना त्यांच्या उत्पादनाचे किमान समर्थन मूल्य (एम.एस.पी.) मिळण्याची हमी असते. या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकर्‍यांना शासकीय कार्यालयात जाण्याचीही गरज लागणार नाही.

स्रोत: नई दुनिया

Share