वांग्याच्या पिकावरील तुडतुड्यांचे व्यवस्थापन –

  • प्रति एकर अ‍ॅसेटामिप्रिड 20% डब्ल्यू पी 80 ग्रॅम फवारून तुडतुड्यांचे नियंत्रण करता येते.
  • पुन्हा रोपण केल्यावर 20 दिवसांनी इमिडाक्लोप्रिड 17.8% प्रति एकर 80 मिली  फवारावे.
  • प्रति एकरी 100 ग्रॅम एव्हिडंट (थिआमेथॉक्सॅम) फवारावे  किंवा
  • अबॅसिन (अबामेक्टीन) 1.8% ईसी प्रत्येक एकरी 150 मिली फवारावे.
Share

वांग्याच्या पिकावरील तुडतुडे कसे ओळखावेत –

  • पिले आणि प्रौढ कीटक पानाच्या खालच्या बाजूने रस शोषून घेतात.
  • संसर्ग झालेली पानांच्या कडा वरच्या बाजूला वळण्यास सुरुवात होते. पान कधी कधी पिवळट पडते आणि त्यावर जळल्यासारखे डाग पडतात.
  • ते अनेक सूक्ष्म जीवाणू आणि विषाणूंचा प्रसार करतात. त्यांच्यामुळे पर्णगुच्छ, मोझेक इत्यादि रोगांचा प्रसार होतो. 
  • रोगाच्या प्रादुर्भावामुळे फलधारणेवर विपरीत परिणाम होतो.
Share