Drip irrigation and Advantages of Drip Irrigation

पाण्याची उपलब्धता हा चांगल्या पिकाचे यशस्वी उत्पादन करण्यासाठी आवश्यक असलेला महत्वाचा घटक असतो. सातत्याने होणार्‍या लोकसंख्या वाढीमुळे आणि हवामानातील बदलांमुळे भूगर्भातील पाणीसाठ्याची पातळी घसरत आहे. त्यामुळे पिकांचे उत्पादन देखील सातत्याने कमी होत आहे. ठिबक सिंचनाचा शोध या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी लावण्यात आला असून ते शेतकर्‍यांसाठी वरदान ठरत आहे. या सिंचन पद्धतीमध्ये पाणी जलस्रोतापासून थेट रोपांच्या मुळांपर्यंत प्लॅस्टिक पाईपचा वापर करून पोहोचवले जाते. 

ठिबक सिंचनामुळे मिळणारे लाभ –

  • अन्य सिंचन पद्धतींच्या तुलनेत 60-70% पाण्याची बचत होते.
  • रोपांना अधिक प्रभावीपणे पोषकद्रव्ये पुरवण्यासाठी ठिबक सिंचन उपयुक्त ठरते. 
  • ठिबक सिंचनामुळे बाष्पीभवन आणि गळतीने होणारी पाण्याची हानी रोखली जाते. 
  • ठिबक सिंचन पद्धतीनुसार पाणी थेट पिकाच्या मुळात दिले जाते. त्यामुळे आजूबाजूची माती कोरडी राहते आणि तणाची वाढ होऊ शकत नाही. 

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्‍यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share