आयुष्मान भारत कार्ड योजनेत सामील व्हा आणि मोफत उपचार करा

देशातील बहुतांश शेतकरी आर्थिक संकटाचा सामना करत आहेत. यामुळे त्यांना स्वत:ला आणि त्यांच्या कुटुंबीयांना योग्य उपचार मिळू शकत नाहीत. अशा परिस्थितीत, कधीकधी ते आपल्या प्रियजनांना अधिक समस्यांमुळे गमावतात. म्हणूनच शेतकऱ्यांची ही अडचण दूर करण्यासाठी भारत सरकार द्वारे ‘आयुष्मान भारत कार्ड योजना’ चालवली जात आहे. या योजनेला ‘प्रधानमंत्री जन आरोग्य योजना’ या नावाने देखील ओळखले जाते. 

या योजनेअंतर्गत देशातील गरीब कुटुंबांना कमीत-कमी 5 लाख रुपयांपर्यंतचा आरोग्य विमा उपलब्ध करून दिला जातो. ज्याच्या मदतीने लाभार्थी कुटुंबांना खाजगी रुग्णालयात महाग असलेले कोणतेही शुल्क न भरता तुम्ही तुमचे उपचार सहज करून घेऊ शकता. केंद्र सरकारच्या या योजनेअंतर्गत देशातील करोडो कुटुंबांना याचा लाभ होत आहे.

आयुष्मान भारत कार्ड योजनेचे मुख्य उद्दिष्ट असे आहे की, देशात एक लाख आरोग्य आणि वेलनेस केंद्रे स्थापन करणे आणि दहा कोटी कुटुंबांना प्रतिवर्षी 5 लाख रुपयांच्या आरोग्य विमा संरक्षणासह जोडणे हे आहे. या योजनेअंतर्गत सामाजिक, आर्थिक आणि जाति जनगणना (एसईसीसी) मध्ये ओळखल्या गेलेल्या D-1 ते D-7 (D-6 वगळता) वंचित वर्गातील ग्रामीण कुटुंबांचा समावेश केला जात आहे. केंद्र सरकारच्या नुसार येणाऱ्या काळात उर्वरित असणाऱ्या वर्गांना देखील या योजनेमध्ये जोडले जाईल. 

आयुष्मान कार्ड योजनेचे फायदे

  • देशातील प्रत्येक दुर्बल आणि गरीब कुटुंबांना आरोग्य सुविधा उपलब्ध करून देणे.

  • मुली, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना प्राथमिकता दिली जाते.

  • या योजनेमध्ये आधीच अस्तित्वात असलेले आजार डे-केयर उपचार आणि फॉलो-अप यासारख्या अनेक अत्यावश्यक आरोग्य सुविधांचा समावेश आहे.

  • योजनेची संबंधित असणारे सर्व लाभार्थी देशातील सर्व तृतीयक आणि  माध्यमिक रुग्णालयांमधून वैद्यकीय उपचार घेऊ शकतात.

आयुष्मान भारत कार्ड योजनेचा लाभ घेण्यासाठी इच्छुक असलेले शेतकरी नेशनल हेल्थ अथॉरिटीच्या अधिकृत वेबसाइट setu.pmjay.gov.in वरती जाऊन ऑनलाइन अर्ज करू शकतात.

स्रोत: कृषि जागरण

कृषी आणि शेतकऱ्यांशी संबंधित फायदेशीर सरकारी योजनांशी संबंधित माहितीसाठी, ग्रामोफोनचे लेख दररोज वाचा आणि हा लेख खाली दिलेल्या बटनावर क्लिक करुन आपल्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका.

Share