How to Control Weeds in Maize:-

मक्यातील तणाचे नियंत्रण

या वर्षी खंडवा, खरगोन, बैतूल छिंदवाड़ा सिवनी येथील मक्याच्या पेरणीखालील क्षेत्र वाढलेले आहे. भरघोस उत्पादनासाठी तणाचे नियंत्रण अत्यावश्यक असते. सामान्यता हाताने निंदणी केली जाते. काही ठिकाणी डवरा वापरुन डवरणी देखील केली जाते. पण शेतकर्‍यांना रासायनिक नियंत्रण जास्त सुलभ आणि सोपे वाटते.

  • पेरणीनंतर 3-5 दिवसात अ‍ॅट्राजिन 50% डब्ल्यूपी @ 500 ग्राम/ एकर या प्रमाणात शिंपडावे.
  • पेरणीनंतर 15-20 दिवसांनी टेम्ब्रोट्ररिओन 42% एससी @ 400 मिली/ एकर वापरावे.
  • पेरणीनंतर 20-25 दिवसांनी 2,4-D 58% @ 400 मिली/ एकर पाण्यात मिश्रण करून फ्लॅट पॅन नोझलने फवारावे.
  • तणनाशकाचा वापर करताना मातीत पुरेशी ओल असावी.
  • तणनाशकाच्या वापरानंतर मातीची हलवाहलव करू नये.
  • कडधान्याबरोबर लागवड केलेली असल्यास अ‍ॅट्राजिन न वापरता पेंडीमेथलीन 30% ईसी @ 800 -1000 मिली/ एकर अंकुरणापूर्वी किंवा पेरणीनंतर तीन दिवसात फवारावे.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्‍यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

Weed Management in Corn

मक्यातील तणाचे नियंत्रण

  • एट्राजीन 50% डब्लू.पी. @500 ग्रॅम/ एकर 200 लीटर पाण्यात मिसळून पेरणीनंतर दुसर्‍या किंवा तिसर्‍या दिवशी अंकुरणापूर्वी वापरावे.
  • पेरणीनंतर 20-25 दिवसांनी किंवा 4-5 पाने फुटल्यावर 2,4-D डायमेथाइल अमीन सॉल्ट 58% एस.एल.@ 600 मिली/ एकरचे द्रावण फ्लॅट पॅन नोझलने फवारावे.
  • तणाला 4-6 पाने फुटलेली असताना टेम्बोट्रायोन 42% एससी @ 115 मिली/ एकर फवारावे.
  • तणनाशकाचा वापर करताना मातीत पुरेशी ओल हवी.
  • तणनाशकाचा वापर केल्यावर मातीची हलवाहलव करू नये.
  • कडधान्याबरोबर पेरणी केली असल्यास एट्राजीन आणि 2,4-D वापरू नये. त्याऐवजी पेंडीमेथलीन @ 300 ग्रॅम/ एकर अंकुरणापूर्वी पेरणीनंतर 3-5 दिवसात वापरावे. |

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्‍यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share