कृषी वीज बिलावरती मिळेल 12000 रुपयांची वार्षिक सब्सिडी

An annual subsidy of Rs 12000 will be available on the agricultural electricity bill

कृषी क्षेत्रातील शेतकऱ्यांचा शेती खर्च कमी करणे आणि उत्पन्न वाढविण्यासाठी सरकार बर्‍याच योजना घेऊन येत आहे. याच स्थितीमध्ये राजस्थानमधील शेतकऱ्यांसाठी सरकार “मुखमंत्री किसान मित्र उर्जा योजना” चालवित आहे. या योजनेच्या मदतीने लघु व मध्यमवर्गीय शेतकर्‍यांना शेतीच्या वापरासाठी जवळपास मोफत वीज दिली जाईल.

या योजनेअंतर्गत कृषी वीज बिलावर दरमहा 1000 रुपये सब्सिडी दिली जाईल. याचा अर्थ असा की, एखाद्या महिन्यात शेतकर्‍याला 1000 रुपयांचे शेती विजेचे बिल मिळाले तर त्याला कोणतीही रक्कम जमा करावी लागणार नाही. या व्यतिरिक्त एखाद्या शेतकऱ्यांचे विजेचे बिल 1000 रुपयांपेक्षा कमी असेल तर त्याची त्या महिन्यासाठी ची जी सब्सिडीची उर्वरित रक्कम पुढील महिन्याच्या रकमेत जोडली जाईल. अशा प्रकारे वीज बिलाच्या सब्सिडीद्वारे शेतकऱ्यांना 12000 रुपये दिले जातील.

स्रोत: किसान समाधान

कृषी व शेतकर्‍यांशी संबंधित फायदेशीर सरकारी योजनांविषयी माहितीसाठी ग्रामोफोनचे लेख दररोज वाचा आणि हा लेख खाली दिलेल्या बटनावर क्लिक करुन आपल्या मित्रांसह देखील शेयर करण्यास विसरू नका.

Share