अक्षय तृतीया की हार्दिक शुभकामनाए

अक्षय तृतीया का साजरी करतात?
हिंदू धर्मात अक्षय तृतीयेबाबत अनेक विश्वास आहेत. त्यातील काही पुढीलप्रमाणे:-

1- भगवान विष्‍णुचे सहावे अवतार समजले जाणारे भगवान परशुराम यांचा जन्‍म या दिवशी झाला. परशुरामांनी महर्षि जमदग्नि आणि माता रेणुकादेवी यांच्या घरी जन्‍म घेतला. त्यामुळे अक्षय तृतीयेच्या दिवशी भगवान विष्‍णुची उपासना करतात. त्या दिवशी परशुरामांची पूजा करण्याचीही पद्धत आहे.

2- या दिवशी गंगा माता स्वर्गातून धरतीवर अवतरली होती. राजा भागीरथने हजारों वर्षे तप करून गंगेला धरतीवर आणले. या दिवशी पवित्र गंगेत बुडी मारल्याने माणसाची सर्व पापे नष्ट होतात.

3- या दिवशी अन्नपूर्णा मातेचा जन्मदिनसुद्धा साजरा केला जातो. या दिवशी गरीबांना जेवण दिले जाते आणि भंडारा केला जातो. अन्नपूर्णा मातेच्या पूजनाने स्वयंपाकघर आणि जेवणातील स्वाद वाढतो.

4- अक्षय तृतीयेच्या दिवशी म‍हर्षि वेदव्‍यासांनी महाभारत लिहिणे सुरू केले. महाभारताला पाचवा वेद समजतात. त्यातच श्रीमद्भागवत गीतेचाही समावेश आहे. अक्षय तृतीयेच्या दिवशी श्रीमद्भागवत गीतेच्या 18 व्या अध्‍यायाचे पठन करावे.

5- बंगालमध्ये या दिवशी भगवान गणेश आणि माता लक्ष्मी यांचे पूजन करून सर्व व्यापारी त्यांच्या रोजमेळाचे (ऑडिट बुक) लेखन सुरू करतात. तेथे या दिवसाला ‘हलखता’ म्हणतात.

6- भगवान शंकरांनी या दिवशी भगवान कुबेरना माता लक्ष्मीची पूजा अर्चना करण्याचा सल्ला दिला. त्यामुळे अक्षय तृतीयेच्या दिवशी माता लक्ष्मीची पूजा करण्याची परंपरा चालत आली आहे.

7- अक्षय तृतीयेच्या दिवशी पांडव पुत्र युधिष्ठीराला अक्षय पात्र प्राप्त झाले. त्यातील जेवण कधीच संपत नसे ही त्याची विशेषता होती.

स्त्रोत:- नवभारत टाइम्स

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्‍यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share