शेतकऱ्यांच्या खात्यात पोहोचू लागला आहे, पीएम किसान चा आठवा हप्ता आपली स्थिती तपासा

8th installment of PM Kisan has started reaching the accounts of farmers

1 एप्रिलपासून पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत  8 व्या हप्त्याचे 2000 रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यात येऊ लागले आहेत. हे लक्षात घेण्यासारखे आहे की, पंतप्रधान किसान योजनेअंतर्गत केंद्र सरकार देशातील शेतकऱ्यांना आर्थिक मदत करण्यासाठी दरवर्षी सहा हजार रुपये देते आणि ही रक्कम तीन हप्त्यांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावर पाठवले जाते. सरकारने आतापर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावर  सात हप्त्यांचे पैसे पाठवले आहेत. आणि त्याचा आठवा हप्ता आता शेतकऱ्यांच्या खात्यात जात आहे.

जर एखाद्या शेतकऱ्यांने या योजनेत नोंदणी केली आहे परंतु ती रक्कम त्याच्या खात्यावर पोहचली नसेल तर, ते ऑनलाईनद्वारे आपली स्थिती तपासू शकतात.

आपली स्थिती तपासण्यासाठी:

  • योजनेच्या अधिकृत संकेतस्थळा- pmkisan.gov.in वर जा आणि शेतकरी कॉर्नर वर क्लिक करा. यानंतर, आपल्याला लाभार्थी स्थिती दिसेल आता त्यावर क्लिक करा.
  • लाभार्थीच्या स्थितीवर क्लिक केल्यानंतर आपल्याला आपला आधार क्रमांक, खाते क्रमांक आणि मोबाईल नंबर द्यावा करावा लागेल.
  • असे केल्यावर आपल्याला आपले नाव पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेच्या लाभार्थ्यांच्या यादीत आहे की नाही याची माहिती मिळेल.
  • जर आपले नाव या यादीमध्ये असेल आणि त्यामध्ये कोणतीही चूक नसेल तर आपल्याला योजनेचा लाभ नक्की मिळेल.

स्रोत: कृषी जागरण

कृषी व शेतकर्‍यांशी संबंधित सरकारी योजनांविषयी माहितीसाठी दररोज ग्रामोफोन चे लेख वाचा आणि खाली दिलेल्या बटणासह आपल्या मित्रांसह शेअर करा.

Share