प्रधानमंत्री कृषी सन्मान निधी योजनेअंतर्गत सातव्या हप्त्याचे 2000 रुपये लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 1 डिसेंबरपासून पाठविणे सुरू झाले आहे. मात्र आता 2 कोटीहून अधिक शेतकर्यांची नावे काढून घेण्यात आल्याची माहिती मिळाली आहे.
सरकारकडून हे पाऊल उचलले जात आहे की, बनावट शेतकर्यांवर कारवाई करण्याचे लक्ष्य आहे. काही दिवसांपूर्वी पंतप्रधान किसान सन्मान निधीच्या पोर्टलवर लाभार्थी शेतकर्यांची संख्या 11 कोटींच्या जवळपास होती, परंतु सरकारने घेतलेल्या या पाऊलानंतर ही संख्या आता 9 कोटी 97 लाखांवर आली आहे.
हे लक्षात घेण्यासारखे आहे की, सरकार दर चार महिन्यांच्या अंतराने शेतकर्यांच्या बँक खात्यात 2 हजार रुपयांचा हप्ता पाठवत आहे. या योजनेअंतर्गत आतापर्यंत 6 हप्ते पाठविण्यात आले असून, सध्या सातवा हप्ता पाठविला जात आहे.
स्रोत: जी न्यूज़
Share