(Hindi) समृद्धि किट

समृद्धि किट

समृद्धि किट
तंत्रज्ञान ब्रॅंड मात्रा लाभ
एनपीके जिवाणूचे मिश्रण टीम बायो 3 (टीबी 3) 3 किलो/एकर रोपांच्या उत्पादकाचा थेट संबंध रोपांच्या निरोगी आणि भरघोस वाढीशी असतो. नत्र (नायट्रोजन), स्फुरद (फॉस्फरस), पालाश (पोटॅश) अशी उर्वरके आपण मातीत मिसळतो, पण  त्या पोषक तत्वांचा मोठा हिस्सा रोपांना मिळू शकत नाही. आपण हे जीवाणू अशा अनुपलब्ध पोषक तत्वांचे उपलब्ध अवस्थेत रूपांतर करण्यासाठी वापरतो.
जस्त (झिंक) विरघळवणारे जिवाणू ताबा जी 4 किलो/एकर भारतातील अधिकांश शेतजमिनीत जस्ताचा (झिंक) अभाव असल्याबाबत किंवा जस्त असले तरी उपलब्ध अवस्थेत नसल्याबाबत आणि त्यामुळे रोपांच्या वाढीस अडथळा येत असल्याबाबत अनेक लेखांमध्ये लिहिलेले असते. हा अभाव दूर करण्यासाठी आपण जस्त (झिंक) विरघळवणारे जिवाणू वापरतो. जस्त (झिंक) रोपांना उपलब्ध करून देण्यासाठी हे जिवाणू मातीत मिसळणे आवश्यक असते.
ट्रायकोडर्मा विरीडी ट्रायको शील्ड

कॉंबॅट

2 किलो/एकर ट्रायकोडर्मा विरिडी हे एक जैविक बुरशीनाशक आहे. ते माती, बियाण्यातील रोगजनकांना मारते. त्यामुळे मूळ कुज, खोड कुज आणि अन्य बुरशीजन्य रोगांपासून पिकाचे संरक्षण होते.
समुद्री शेवाळाचे सत्व लाटू 4 किलो/एकर हे उत्पादन ह्यूमिक अॅसिड, समुद्री शेवाळ, अमीनो अॅसिड अशा अनेक उत्पादनांचे मिश्रण आहे. ह्यूमिक अॅसिड मृदेची गुणवत्ता सुधारण्याबरोबरच मातीची जलधारण क्षमता वाढवते. समुद्री शेवाळ रोपांमध्ये अमीनो अॅसिड निर्माण करते. त्यामुळे प्रकाश संश्लेषण प्रक्रियेस सहाय्य होते. परिणामी रोपांचा चांगला विकास होतो आणि त्यांचे आरोग्य सुधारते.
मायकोरायझा क्रिस्टोरायझा 4 किलो/एकर हे रोपाच्या मुळांच्या वाढीस आणि विकासास सहाय्य करतात.  ते नत्र (नायट्रोजन), स्फुरद (फॉस्फेट), पोटॅशियम, लोह, मॅंगनीज, मॅग्नीशियम,तांबे, जस्त, बोरॉन, सल्फर आणि मोलिब्डेनमसारखे पोषक तत्वे मातीतून मुळांपर्यंत पोहोचवतात. त्यामुळे रोपांना अधिक मात्रेत पोषक तत्वे मिळतात. ते पिकाची प्रतिकारशक्ती वाढवते. त्यामुळे उत्पादनाची गुणवत्ता वाढते. मायकोरायझा मुळांची वाढ घडवून आणत असल्याने पीक जास्त जागेतून पाणी शोषून घेऊ शकते.

 

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्‍यांपर्यंत  पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share