How to protect our crops from White Grubs

शेणकिडयापासून (पांढरी हुमणी) पिकाचा बचाव

पांढरी हुमणी हे शेतकर्‍यांसाठी मोठे आव्हान ठरत आहे. या किडीच्या हल्ल्यामुळे 80-100 टक्के हानी होण्याची शक्यता असते. 2-14 हुमण्यांमुळे पिकाची 64.7 टक्केपर्यंत हानी नोंदवली गेलेली आहे.

जीवन चक्र:-

  1. ही कीड पहिल्या पावसानंतर कोशातून बाहेर येते आणि त्यानंतर एका महिन्यात जमिनीत 8 इंच खोलीवर अंडी घालते.
  2. या अंड्यातून 3-4 आठवड्यात अळ्या निघतात.
  3. या किडीच्या अळ्या 4-5 महिन्यात अवस्था बदलत पिकाला हानी करतात आणि उन्हाळा सुरू होण्यापूर्वी किडे पुन्हा कोशात जातात.

नियंत्रण कसे करावे ?

रासायनिक उपचार:- फेनप्रोपेथ्रिन 10% ईसी  @ 500 मिली प्रति एकर, फिप्रोनिल 40% + इमिडाक्लोप्रिड 40% डब्ल्यूजी @ 100 ग्रॅम/ एकर किंवा क्लोरपायरीफॉस 20% ईसी @ 500 मिली/ एकर मातीत मिसळावे.

जैविक उपचार:– मेटाराइजियम स्पी. @ 1 किग्रॅ/ एकर आणि बेवरिया + मेटाराइजियम  स्पी. @ 2 किग्रॅ/ एकर या प्रमाणात उर्वरकाबरोबर फवारावे.

यांत्रिक नियंत्रण:-  लाइट ट्रॅप वापरावेत.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्‍यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share