Irrigation management in muskmelon
खरबूजात सिंचनाची आवश्यकता
- उन्हाळ्यात दर आठवड्याला सिंचन करावे.
- सिंचन हलके असावे.
- फळे परिपक्व होण्याच्या वेळी अत्यावश्यक असेल तरच सिंचन करावे.
- सिंचन करताना फळ जास्त वेळ ओलीत राहणार नाही अशी खबरदारी घ्यावी. जास्त वेळ ओलीत फळे राहिल्याने ती कुजतात.
खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.
ShareControl of fruit rot in brinjal
वांग्यातील फळाच्या कुजीचे नियंत्रण
- अत्यधिक ओल या रोगाच्या विकासास सहाय्यक ठरते.
- फळांवर जळल्यासारखे शुष्क डाग पडतात. ते हळूहळू सर्व फळांवर पसरतात.
- रोगग्रस्त फळांची वरील बाजू राखाडी होते आणि तिच्यावर पांढरी बुरशी जमते.
- या रोगाने ग्रस्त रोपांची पाने आणि इतर भाग तोडून नष्ट करावेत.
- मॅन्कोझेब 75% WP @ 400 ग्रॅम प्रति एकर किंवा टेबुकोनाझोल 25 % ईसी @ 250 ग्रॅम प्रति एकर फवारावे.
खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.
ShareSowing and seed rate in muskmelon
खरबूजाच्या पेरणीची पद्धत आणि बियाण्याचे प्रमाण
- खरबूजाच्या पेरणीसाठी डबलिंग पद्धत आणि पुनर्रोपण पद्धत वापरली जाते.
- खरबूजाच्या बियाण्याच्या पेरणीसाठी 3-4 मीटर रुंद वाफे तयार करावेत आणि त्यात पेरणी करावी.
- एका वेळी दोन बियाणी पेरावीत आणि दोन वाफ्यात 60 सेमीचे अंतर ठेवावे.
- बियाणे सुमारे 1.5 सेमी खोलीवर पेरावे.
- एएकर जमिनीत पेरणी करण्यासाठी 300 -400 ग्रॅम बियाण्याची आवश्यकता असते.
खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.
ShareControl of tobacco caterpillar in Tomato
टोमॅटोमधील तंबाखू अळीचे नियंत्रण
- उन्हाळ्यात खोल पेरणी करावी.
- रोगग्रस्त भागांना गोळा करून नष्ट करावे.
- प्रत्येक एकरात 5 फेरोमॉन ट्रॅप लावावेत. त्यामुळे वाढ झालेल्या किडीचे शेतात येणे लक्षात येईल.
- प्रोफेनोफॉस 50% ईसी @ 400 मिलीलीटर/ एकर किंवा क़्वीनाल्फास 25% ईसी @ 400 मिलीलीटर/ एकर फवारावे.
- हल्ला तीव्र असल्यास अॅमामेक्टीन बेंज़ोएट @ 200 ग्रॅम प्रति हेक्टर वापरावे.
खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.
ShareFlower Promotion in bottle gourd
दुधी भोपळ्याच्या फुलोर्याच्या वाढीसाठी उपाययोजना
- दुधी भोपळ्याच्या पिकात फुलोरा येण्याची अवस्था खूप महत्वपूर्ण असते.
- दुधी भोपळ्याच्या उत्पादनात फुलांच्या संख्येचे खूप महत्वपूर्ण स्थान असते.
- खालीलपैकी काही उत्पादने वापरुन पिकावरील फुलांची संख्या वाढवता येते:
- होमोब्रासिनोलॉइड 0.04% डब्लू/डब्लू 100-120 मिली./एकर फवारावे.
- समुद्री शेवाळाचे सत्व 180-200 मिली. /एकर वापरावे.
- सूक्ष्म पोषक तत्वे 300 ग्रॅम/एकर फवारावे.
- 2 ग्रॅम /एकर या प्रमाणात जिब्रेलिक अॅसिड देखील फवारता येते.
खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.
ShareControl of mosaic virus in watermelon
कलिंगडावरील केवडा रोगाच्या मोझेक व्हायरसचे नियंत्रण
- या रोगाची सुरुवातीची लक्षणे पानांवर दिसतात आणि नंतर देठ आणि फळांवर देखील पसरतात.
- ग्रस्त रोपांच्या फळांचा आकार बदलतो. फळे लहान राहतात आणि फांद्यांवरून गळून पडतात.
- हा रोग माव्याद्वारे पसरतो.
- या रोगापासून बचावासाठी पीक चक्र अवलंबावे आणि रोगमुक्त बियाणे वापरावे.
- रोगग्रस्त रोपे उपटून नष्ट करावीत.
- इमिडाक्लोप्रिड 17.8% एसएल @70-100 मिली/एकर फवारावे.
खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.
ShareSeed treatment of coriander
धने/ कोथिंबीरीच्या पिकासाठी बीजसंस्करण
- बियाणे 12 तास पाण्यात भिजवावे.
- कार्बोक्सिन 37.5 + थायरम 37.5 @ 2.5 ग्रॅम/ किलोग्रॅम बियाणे वापरुन बीजसंस्करण करावे.
खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.
ShareControl of mosaic in tomato
टोमॅटोमधील केवडा रोगाच्या मोझेक व्हायरसचे नियंत्रण
- पानांचा सामान्य हिरवा रंग बदलून फिकट पिवळे अनियमित आकाराचे डाग उमटतात.
- पाने करड्या रंगाची, क्लोरोफिल विहीन, आकाराने लहान होतात आणि फळे नष्ट होतात.
- बियाणे नेहमी रोगमुक्त झाडांपासून गोळा करावे.
- नर्सरीमध्ये निर्जलीकृत माती बियाणे/ रोपे तैय्यार करण्यासाठी वापरावी.
- रोगग्रस्त रोपे उपटून नष्ट करावीत.
- इमिडाक्लोप्रिड (17.8% SL) @ 100-120 मिली प्रति एकर किंवा अॅसीफेट (75% SP ) @ 140- 200 ग्रॅम प्रति एकर वापरावे.
खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.
ShareSowing time in coriander
धने/ कोथिंबीरीच्या पेरणीसाठी सुयोग्य वेळ
- कोथिंबीरीच्या उत्पादनासाठी जून-जुलै महिन्यात पेरणी करावी.
- धन्याच्या उत्पादनासाठी ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये पेरणी करावी.
खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.
Share