Sowing method of sweet corn

स्वीट कॉर्न पेरणीची पद्धत

  • सर्‍यांच्या माथ्यापासून सुमारे एक तृतीयांश अंतरावर हाताने बियाणे पेरले जाते.
  • अंकुरणानंतर 10 दिवसांनी अतिरिक्त रोपांना उपटून रोपांची संख्या संतुलित ठेवली जाते. त्यामुळे प्रत्येक रोपाला वाढीस पुरेशी जागा मिळते.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्‍यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

Seed rate for Cabbage

पानकोबीसाठी बियाण्याचे प्रमाण

  • हायब्रीड वाणांसाठी:- 175-200 ग्रॅम/एकर बियाणे आवश्यक असते.
  • उन्नत वाणांसाठी:- 400-500 ग्रॅम/एकर बियाण्याची आवश्यकता असते.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्‍यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

Seed treatment in Cabbage

पानकोबीचे बीज संस्करण

  • निरोगी बियाणे पेरावे.
  • पेरण्यापूर्वी 2 ग्रॅम कार्बोक्सिन 37.5% + थायरम 37.5% WP  प्रति कि. ग्रॅम या प्रमाणात वापरुन बीज संस्करण करावे.
  • नर्सरी शेतात एकाच जागी वारंवार बनवू नये.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्‍यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

Climate and soil for sweet corn

स्वीट कॉर्नसाठी योग्य हवामान आणि माती

  • मक्याच्या पिकासाठी उष्ण हवामान उत्तम असते.
  • चांगल्या अंकुरणासाठी 18 °C हून अधिक तापमान असावे.
  • चांगल्या विकास आणि गुणवत्तेसाठी योग्य तापमान 24 °C ते 30 °C असते.
  • स्वीट कॉर्नसाठी पाण्याचा उत्तम निचरा होणारी, पुरेशी आर्द्र माती उपयुक्त असते.
  • स्वीट कॉर्नच्या चांगल्या उत्पादनासाठी 5.8 – 6.5 pH पी. एच. स्तर असावा.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्‍यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

Suitable soil for Cauliflower

फुलकोबीसाठी उपयुक्त माती

  • फुलकोबीच्या शेतीसाठी पाण्याचा उत्तम निचरा होणारी आणि पी. एच. स्तर 5.5 ते 6.8 असलेली हलकी आणि लोम माती उत्तम असते.
  • लवकर तयार होणार्‍या वाणांसाठी हलकी माती तर मध्य अवधी आणि उशिरा तयार होणार्‍या वाणांसाठी जड लोम माती उपयुक्त असते.
  • लवणीय मातीत बुरशीजन्य आणि जिवाणूजन्य रोगांची जास्त लागण होते.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्‍यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

Nursery bed preparation for Cabbage

पानकोबीसाठी नर्सरी बनवणे

  • बियाणे वाफ्यात पेरले जाते. सामान्यता 4 – 6 आठवडे वयाची रोपे पुनर्रोपित केली जातात.
  • वाफ्यांची ऊंची 10 ते 15 से.मी. असते आणि आकार 3 x 6 मी. असतो.
  • दोन वाफ्यात 70 से.मी. अंतर असते. त्यामुळे निंदणी सारखी आंतरिक कामे करणे सोपे जाते.
  • नर्सरीतील वाफ्यांची माती भुसभुशीत आणि समतल असावी.
  • नर्सरी वाफे तयार करताना 8-10 कि.ग्रॅ. शेणखत प्रति वर्ग मीटर मिसळावे.
  • जड मातीत उंच वाफे तयार करून पाणी तुंबण्याची समस्या सोडवता येते.
  • आर्द्र गलन रोगापासून होणार्‍या हानीचा बचाव करण्यासाठी थायोफेनेट मिथाइल 70% चे 30 ग्रॅम प्रति 15 लीटर पाण्यात मिश्रण बनवून मातीत मिसळावे.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्‍यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

Root knot nematode of coriander

धने/ कोथिंबीरीच्या पिकात मुळांवरील गाठी

  • संक्रमित मुळांमध्ये गाठ होते आणि अनिश्चित आकारात ती सगळ्या मुळावर पसरते.
  • नियंत्रणासाठी निरोगी बियाणे वापरावे.
  • शेतात वापरली जाणारी यंत्रे आणि अवजारे स्वच्छ ठेवावीत.
  • धने/ कोथिंबीरीच्या पिकातील तणाचा नायनाट करावा.
  • ज्या शेतात या रोगाची लागण होण्याची शक्यता आहे तेथे उन्हाळ्यात खोप नांगरणी करावी आणि शेताला उन्हात तापू द्यावे.
  • संक्रमण रोपावर होते तेव्हा ठिबक सिंचनाद्वारे 2-4 किलोग्रॅम प्रति एकर पॅसीलोमायसिस लीलासिन्स वापरुन जैविक नियंत्रण करावे.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्‍यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

Harvesting of muskmelon

खरबूजांची तोडणी

  • वाण आणि हवामानानुसार सुमारे 110 दिवसात फळे तोडणीस तयार होतात.
  • फळे परिपक्व होतात तेव्हा त्यांच्या बाह्य आवरणाचा रंग बदलतो आणि साल नरम होते.
  • पिकलेले फळ सहजपणे वेलापासून तुटते.
  • खरबूजाची तोडणी हाताने केली जाते.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्‍यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

Importance of mulching in tomato

टोमॅटोच्या पिकासाठी मल्चिंगचे महत्त्व

  • प्लास्टिक मल्चिंग टोमॅटोच्या पिकाला किडी, रोग आणि तणापासून वाचवते.
  • काळ्या रंगाच्या पॉलिथीनद्वारे तणाचे नियंत्रण केले जाते आणि हवा, पाऊस आणि सिंचनाने होणारी मातीची धूप पण रोखली जाते.
  • पारदर्शक पॉलीथिन वापरुन मृदाजन्य रोगांना आणि आर्द्रतेला नियंत्रित केले जाते.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्‍यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

Cutting in makkhan grass

चार्‍यासाठीच्या मक्खन घास गवताची कापणी

  • पहिली कापणी पेरणीनंतर 50-60 दिवसांनी किंवा गवत 50 ते 60 सेमी उंच झाल्यावर करावी.
  • पुढील कापणी विकासानुसार 25 ते 30 दिवसांच्या अंतराने करावी.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्‍यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share