शेतीसाठी शेतकर्यांना बी-बियाणे, कीटकनाशके, खते, सिंचन आणि कृषी उपकरणे इत्यादींची गरज असते. मात्र, अनेक शेतकऱ्यांना आर्थिक अडचणींमुळे ते खरेदी करता येत नाही. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांची ही अडचण दूर करण्यासाठी केंद्र सरकार ‘किसान क्रेडिट कार्ड योजना’ चालवित आहे.
किसान क्रेडिट कार्ड योजना काय आहे?
शेतकऱ्यांना या विशेष कार्डाच्या मदतीने कमी व्याजदरात कर्ज मिळू शकते. या योजनेअंतर्गत 3 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज 5 वर्षांसाठी फक्त 7% व्याजदराने दिले जाते. दुसरीकडे, जर हे कर्ज वेळेपूर्वी परत केले गेले, तर व्याजावर 3% सूट देखील आहे. हे कर्ज केवळ शेतीसाठीच नाही तर मत्स्यपालन आणि पशुसंवर्धनासाठीही दिले जाते.
केसीसीसाठी आवश्यक कागदपत्रे आणि अर्ज प्रक्रिया
या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदाराचे वय 18 ते 75 वर्षे दरम्यान असावे. अर्ज करण्यासाठी फक्त आधार कार्ड, पॅन कार्ड आणि लाभार्थीचा फोटो आवश्यक आहे. तर अर्जाचा फॉर्म पीएमकेवाय या अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध आहे. अशा परिस्थितीत सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी लवकरात-लवकर केससी साठी अर्ज करा.
स्रोत : किसान जागरण
कृषी आणि शेतकऱ्यांशी संबंधित फायदेशीर सरकारी योजनांशी संबंधित माहितीसाठी, ग्रामोफोनचे लेख दररोज वाचा आणि हा लेख खाली दिलेल्या बटनावर क्लिक करुन आपल्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका.
Share