राजस्थान सरकारद्वारा मुख्यमंत्री किसान मित्र ऊर्जा योजना सुरू केली आहे, खरं तर ही योजना कृषी खर्च कमी करण्यासाठी ती उपयुक्त ठरणार आहे आणि या योजनेमुळे लाखो शेतकऱ्यांना वीज बिलात थोडा दिलासा देखील मिळणार आहे.
या योजनेअंतर्गत राज्यातील शेतकऱ्यांना वीज बिलावर मासिक 1000 रुपयांपर्यंतचे अनुदान दिले जाते. राज्याचे ऊर्जा मंत्री श्री.भंवर सिंह भाटी या योजनेबाबत बोलताना म्हणाले की, “मुख्यमंत्री किसान मित्र योजनेंतर्गत, 8 लाख 84 हजारांहून अधिक शेतकऱ्यांना लाभ देण्यासाठी 231 करोड़ रुपयांचे अतिरिक्त अनुदान देण्यात आले आहे. यापैकी 3 लाख 41 हजारांहून अधिक शेतकऱ्यांची वीज बिले शून्य स्तरावरती आली आहेत.
स्रोत: किसान समाधान
आपल्या गरजांबद्दल अधिक महत्त्वाच्या माहितीसाठी दररोज ग्रामोफोनचे लेख वाचा आणि तुमच्या शेतीच्या समस्यांचे फोटो समुदाय सेक्शन विभागात पोस्ट करा आणि कृषी तज्ञांकडून सल्ला घ्या.
Share