प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत आठव्या हप्त्याचे 2000 रुपये 9.50 कोटी शेतकर्यांच्या बँक खात्यात पाठविण्यात आले आहेत. लक्षात घेण्यासारखे आहे की, पंतप्रधान किसान योजनेअंतर्गत केंद्र सरकार देशातील शेतकर्यांना आर्थिक मदत करण्यासाठी दरवर्षी 6,000 रुपये देते. ही रक्कम तीन हप्त्यांमध्ये शेतकर्यांच्या खात्यावर पाठविली जाते. सरकारने आतापर्यंत शेतकर्यांच्या खात्यावर सात हप्त्याचे पैसे पाठविले आहेत. आणि आता त्याचा आठवा हप्ता आता शेतकर्यांच्या खात्यावर पाठविण्यात आला आहे.
जर एखाद्या शेतकर्यांने या योजनेत नोंदणी केली असेल परंतु ती रक्कम त्याच्या खात्यावर पोहचली नसेल, तर ते आपली ऑनलाईनद्वारे त्याची स्थिती तपासू शकता.
आपली स्थिती तपासण्यासाठी:
योजनेच्या अधिकृत संकेतस्थळ- pmkisan.gov.in वर जा आणि शेतकरी कॉर्नर वर क्लिक करा. यानंतर, आपल्याला लाभार्थी स्थिती दिसते. आता त्यावर क्लिक करा.
लाभार्थीच्या स्थितीवर क्लिक केल्यानंतर आपल्याला आपला आधार नंबर, खाते नंबर आणि मोबाईल नंबर द्यावा करावा लागेल.
असे केल्यावर आपल्याला आपले नाव पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेच्या लाभार्थ्यांच्या यादीत आहे की नाही याची माहिती मिळेल.
जर आपले नाव या यादीमध्ये असेल आणि त्यामध्ये कोणतीही चूक नसेल तर आपल्याला योजनेचा लाभ नक्की मिळेल.
स्रोत: कृषी जागरण
Share